Breaking News

जबरा फॅन! टेकडीवरून केले टीम इंडियाला चिअर

पुणे ः प्रतिनिधी

महाराष्ट्रातील कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता पुण्यात सुरू असलेल्या भारत-इंग्लंड वन डे मालिकेत स्टेडियमवर प्रेक्षकांना परवानगी नाकारण्यात आली आहे. अशातही भारतीय क्रिकेट संघाचे चाहते स्टेडियमबाहेर उभे राहून किंवा स्टेडियमशेजारील इमारतीच्या टेरेसवर जाऊन चिअर करताना दिसत आहेत. टीम इंडियाचा जबरा फॅन सुधीरकुमार चौधरी हा तर विराट कोहली अ‍ॅण्ड कंपनीला चिअर करण्यासाठी चक्क टेकडीवर जाऊन बसला.  महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या मैदानावर भारत-इंग्लंड यांच्यातल्या वन डे मालिकेचे सामने सुरू आहेत. तिथून जवळपास अर्ध्या किलोमीटरवर असलेल्या वाघजाई मंदिराच्या टेकडीवर सुधीर कुमार चौधरी जाऊन बसला आणि तिथून तो टीम इंडियाला चिअर करीत होता. मूळचा बिहारचा असलेला सुधीर हा दिग्गज फलंदाज सचिन तेंडुलकर याचा जबरदस्त फॅन आहे. टीम इंडियाला चिअर करण्यासाठी तो शरीरावर तिरंग्याचा रंग लावतो आणि तेंडुलकर असे लिहून हातात तिरंगा व शंख घेऊन मैदानावर उपस्थित असतो.

Check Also

अनधिकृत व्यापार जिहादवर कडक कारवाई करा

आमदार प्रशांत ठाकूर यांची नागपूर अधिवेशनात जोरदार मागणी नागपूर : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका हद्दीत …

Leave a Reply