
खारघर ः राष्ट्रीय सायकलिंग अजिंक्यपद स्पर्धेत रौप्यपदक पटकाविणार्या स्नेहल शत्रुघ्न माळी हिचे भाजप उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी तिच्या निवासस्थानी जाऊन अभिनंदन केले. या वेळी जिल्हा चिटणीस गीता चौधरी, सदस्य उमेश इनामदार, खारघर मंडल अध्यक्ष ब्रिजेश पटेल, महिला मोर्चा सरचिटणीस साधना पवार, नगरसेवक रामजी बेरा, प्रवीण पाटील, नगरसेविका नेत्रा पाटील, खारघरचा राजा गणेश मंडळाचे अध्यक्ष विजय पाटील आदी उपस्थित होते.