Breaking News

समाजाभिमुख जीवन जगा : लोकनेते रामशेठ ठाकूर; महात्मा फुले महाविद्यालयात पदवीदान समारंभ

पनवेल ः रामप्रहर वृत्त

रयत शिक्षण संस्थेच्या पनवेल येथील महात्मा फुले कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्याल्याचा पदवी प्रमाणपत्र वितरण समारंभ संस्थेच्या मॅनेजिंग कौन्सिलचे सदस्य, माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली आणि पनवेलचे तहसीलदार विजय तळेकर यांच्या प्रमुख उपस्थित झाला. शैक्षणिक वर्ष 2019-20मध्ये पदवी आणि पदव्युत्तर विभागातून उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना या समारंभात मान्यवरांच्या हस्ते पदवी प्रमाणपत्र आणि सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. या वेळी आपल्या अध्यक्षीय मार्गदर्शनात लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी विद्यार्थ्यांना समाजाभिमुख जीवन जगण्याचा संदेश दिला तसेच आपल्या यशाची कीर्ती सर्वदूर पसरो, असा आशावादही त्यांनी व्यक्त केला. तहसीलदार विजय तळेकर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना आपल्या संघर्षाच्या काळातील अनेक आठवणी त्यांनी सांगितल्या. सकारात्मक दृष्टिकोन हाच यशाचा राजमार्ग आहे, असे प्रतिपादन त्यांनी केले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. गणेश ठाकूर  यांनी या समारंभाचे प्रास्ताविक केले. यात त्यांनी महाविद्यालयाच्या विकासाचा आढावा घेतला, तसेच त्यांनी उपस्थित मान्यवरांचा शाल, ग्रंथ आणि सन्मानचिन्ह देऊन यथोचित गौरव केला. या समारंभाला कला शाखेचे अधिष्ठाता डॉ. राजाराम पाटील, वाणिज्य शाखेचे अधिष्ठाता डॉ. नरेश मढवी आणि विज्ञान शाखेचे अधिष्ठाता प्रा. जी. जे. कोरणे उपस्थित होते. समारंभाचे सूत्रसंचालन डॉ. प्रफुल्ल वशेणीकर, प्रा. सोनू तवर आणि प्रा. प्रवीण गायकर यांनी केले. कला, विज्ञान आणि वाणिज्य शाखेतून प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झालेल्या पदवीधारकांचा या वेळी मान्यवरांच्या हस्ते यथोचित गौरव करण्यात आला.

Check Also

नितीन पाटील यांच्या रूपाने पनवेलला मिळणार पहिला आगरी समाजाचा महापौर

उपमहापौरपदासाठी प्रमिला पाटील यांचा अर्ज दाखल पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल महानगरपालिकेच्या महापौर व उपमहापौरपदाकरिता होणार्‍या …

Leave a Reply