Breaking News

नेरळ वडवली येथे दोन गटात हाणामारी

नेरळ पोलीस ठाण्यात परस्पर विरोधी गुन्हे दाखल

कर्जत : बातमीदार : नेरळ पोलीस ठाणे हद्दीमधील वडवली गावातील बौद्धवाड्यामधील दोन गटात किरकोळ वादातून हाणामारीची घटना घडली. लाकडी दांडके आणि लोखंडी सुर्‍यांचा वापर करून केलेल्या झालेल्या या हाणामारीत काही जण जखमी झाले आहेत.

नेरळ-कर्जत रस्त्यावर असलेल्या वडवली गावातील अनंत हरिचंद्र सोनवणे हे बुधवारी (दि. 10) सायंकाळी आपल्या घराच्या गच्चीवर उभे असताना त्यांना शिवीगाळ केली. त्याचा जाब विचारण्यासाठी त्यांच्या कुटुंबातील काही जण फिर्यादसह गेले असता, त्यांना लाकडी दांडक्यांनी मारहाण करण्यात आली. तर दोन महिलांना शिवीगाळ करण्यात आली. त्याचा राग आल्याने लाकडी दांडक्याने मारहाण झालेल्या सोनावणे कुटुंबाने आपल्या अंगणातून जाताना प्रेम मनोहर सोनावणे आणि अन्य 8 लोकांना यांना प्रथम शिवीगाळ आणि नंतर हातांनी मारहाण केली. हे भांडण सोडविण्यासाठी पुढे आलेल्या तिघांवर लोखंडी धारदार सुर्‍याने वार केले असून त्यात दोघे जखमी झाले आहेत. तर काहींना बेंजोचे लोखंडी स्टॅन्ड यांच्या सहाय्याने मारहाण करण्यात आल्याने ते जखमी झाले आहेत. वडवली गावातील हाणामारीची फिर्याद अनंत हरिचंद्र सोनावणे आणि प्रेम मनोहर सोनावणे यांनी दिली असून, नेरळ पोलीस ठाण्यात परस्परविरोधी गुन्हे नोंद केले आहेत.

अनंत सोनावणे यांनी दिलेल्या फिर्यादीत सुभाष धाऊ सोनावणे, प्रेम मनोहर सोनावणे, सिद्धार्थ भीमराव सोनावणे, उज्ज्वल सुभाष सोनावणे, संभाजी धाऊ सोनावणे, सुजाता सुभाष सोनावणे आणि अरुणा मनोहर सोनावणे यांच्यावर भादवी कलम 324, 143, 144, 147, 148,1 49,405, 506, आणि मुंबई पोलीस ऍक्ट 37(1)(3) 135खाली गुन्हे नोंद दाखल करण्यात आले आहेत.तर  प्रेम सोनावणे यांच्या फिर्यादीवरुन सूर्यकांत गायकवाड, उमेश गायकवाड, निलेश गायकवाड, राजेश गायकवाड, रतन गायकवाड, मिलिंद गायकवाड, तानाजी गायकवाड, संदीप गायकवाड यांच्यावर भादवी कलम 324, 323, 143,144, 147, 148, 506, मुंबई पोलीस ऍक्ट 37(1)(3)135 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी सहाय्यक पोलीस उप निरीक्षक जाधव अधिक तपास करीत आहेत.

Check Also

कामोठे येथील लोकनेते रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलमध्ये दहावीच्या विद्यार्थ्यांचा शुभचिंतन सोहळा

कामोठे : रामप्रहर वृत्तरयत शिक्षण संस्थेच्या कामोठे येथील लोकनेते रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलमध्ये इयत्ता दहावीच्या …

Leave a Reply