खालापूर : प्रतिनिधी : बंदी असतानादेखील गोवंश कत्तल करून मांसाची विक्री करणार्या मुस्ताकीन रशिद पटेल (वय 28) आणि रज्जाक शेख अली माडलेकर (वय 38, रा. हाल) या दोघांना खालापूर पोलिसांनी अटक केली आहे.
हाल गावात गोवंश कतलीसाठी जनावरे आणून मांसाची विक्री होणार असल्याची माहिती खालापुर पोलिसांना मिळाली होती. त्या आधारे पोलीस निरीक्षक विश्वजीत काईगंडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार राम पवार, पोलीस नाईक नितीन शेडगे, रणजित खराडे, हेमंत कोकाटे, रुपेश भोनकर, हवालदार योगेश जाधव, समीर पवार यांच्या पथकाने हाल गावात छापा टाकला असता कत्तल केलेले गोमांस आणि कत्तलीच्या उद्देशाने बांधून ठेवलेले चार गोवंश आढळून आले. खालापूर पोलिसांनी मुस्तकीन पटेल आणि मांडलेकर यांना ताब्यात घेत गोमांस जपत केले.