Breaking News

पनवेल मनपाची मालमत्ता कर अभय योजना

पनवेल : प्रतिनिधी

पनवेल शहरातील पूर्व श्रमित नगरपालिका हद्दीतील मालमत्ता धारकांसाठी महापालिकेने मालमत्ता कर अभय योजना जाहीर केली आहे. पनवेल शहरातील ज्या मालमत्ता धारकांना मालमत्ता कराचे बिल देण्यात आले आहे. त्यांच्यासाठी ही मालमत्ता कर अभय योजना आहे.पनवेल शहरातील 43 हजार मालमत्ता धारकांना मालमत्ता कराचे बिल देण्यात आले आहे. ज्यांनी अजूनही मालमत्ता कर भरला नाही त्यांना या योजनेचा लाभ घेता येऊ शकतो. पनवेल पालिका हद्दीतील मालमत्ता करावर 2020-21 या वर्षापर्यंत लावण्यात आलेल्या मालमत्ता करावरील व्याज, दंड, शास्ती 15 एप्रिलपर्यंत संपूर्ण कर भरल्यास 50 टक्के सवलत,  माफी देण्यात आली आहे. 30 एप्रिलपर्यंत कर भरणा केल्यास 25 टक्के सवलत, माफी देण्यात आली आहे. तसेच संपूर्ण मालमत्ता कर (शासन कर वगळून) एकत्रित भरल्यास नियमानुसार पाच टक्के व ऑनलाइन कर भरणा केल्यास अतिरिक्त दोन टक्के सूट देण्यात येईल. पनवेलमधील मालमत्ताधारकांनी या योजनेचा लाभ घेऊन मालमत्ता करातून सवलत घ्यावी, असे आवाहनही पालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.

Check Also

अनधिकृत व्यापार जिहादवर कडक कारवाई करा

आमदार प्रशांत ठाकूर यांची नागपूर अधिवेशनात जोरदार मागणी नागपूर : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका हद्दीत …

Leave a Reply