Breaking News

उरण प्राथमिक सहकारी पतसंस्थेची ऑनलाइन सभा

कळंबोली : बातमीदार

उरण प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्थेची 44वी वार्षिक सभा ऑनलाइन पद्धतीने झाली. या सभेस सभासदांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देऊन आपला सहभाग नोंदवला व सभा यशस्वी केली. उरण प्राथमिक शिक्षक सहकारी पतपेढी लि.ची 44वी वार्षिक सभा संस्थेचे चेअरमन नवनीत गावंड यांच्या अध्यक्षतेखाली  नुकतीच ऑनलाइन झाली. यामध्ये 289 सभासदांनी ऑनलाइन पद्धतीने सहभाग घेतला. सभेची सुरुवात संस्थेचे संस्थापक स्व. ह.बा.शिंदे गुरुजी यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली. स्मितकाव्य गीत मंचमार्फत ईशस्तवन, स्वागतगीत सादर करण्यात आले. त्यानंतर सर्व संघटनांचे पदाधिकारी, शिक्षक प्रतिनिधी व माजी चेअरमन, ठेवीदार, हितचिंतक व सेवानिवृत्त शिक्षक यांचे शब्दसुमनांनी स्वागत करण्यात आले. गतवर्षात स्वर्गवासी झालेल्या व्यक्तींना संस्थेमार्फत श्रद्धाजंली वाहण्यात आली.  संस्थेचे चेअरमन नवनीत गावंड यांनी संस्थेची प्रगती व भावी वाटचाल याविषयी अध्यक्षीय प्रास्ताविकात माहिती दिली. संस्थेच्या सचिव प्रिती शिवतरकर यांनी गतवर्षीच्या सभेचा अहवाल सभासदांसमोर मांडला. त्याला सर्वानुमते मंजुरी देण्यात आली. या ऑनलाइन सभेत सभासदांनी ठराव मांडून त्यास मंजुरी घेण्यात आली. अनेक सभासदांनी विविध सूचनादेखील केल्या. या सभेत शिक्षकांच्या पाल्याच्या शिक्षणासाठी विशेष कमी व्याजतील कर्जाची तरतूद करून मृत्यू पावलेल्या पतसंस्थेच्या सभासदांच्या कुटुंबाला दिलासा देण्यासाठीही आर्थिक उपाययोजना मंजूर करण्यात आली आहे. राष्ट्रगीताने सभेची सांगता करण्यात आली.

Check Also

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रयत्नातून एक कोटी 35 लाख रुपयांच्या विकासकामांचा शुभारंभ

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदार संघातील ग्रामिण भागात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली …

Leave a Reply