अलिबाग : प्रतिनिधी
जागतिक पर्यटन दिनानिमित्त वरसोली अलिबाग येथे साफसफाई आणि प्लास्टिक कचरा संकलनाचा कार्यक्रम आयोजित केला होता. त्यात 50 हून अधिक लोकांनी सहभाग घेतला.
या अभियानात रोटरॅक्ट क्लब अलिबाग तर्फे प्रतीक, तन्वी, गौरी, हर्षवर्धन, अलिबाग कृषी पर्यटन विकास संस्थेचे उपाध्यक्ष शेखर पडवळ, वरसोली कॉटेज वेल्फेअरचे अध्यक्ष मकरंद नाईक, माणुसकी प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. राजाराम हुलवान, तानाजी आगलावे व सदस्य, तसेच वरसोली ग्रामपंचायत कर्मचारी सहभागी झाले होते.
रोटरी क्लब ऑफ अलिबाग सिशोरने पुढाकार घेऊन नियोजन केलेल्या या कार्यक्रमास क्लबचे अध्यक्ष डॉ. राजेंद्र चांदोरकर, माजी अध्यक्ष डॉ. किरण नाबर, कोषागार निमिष परब, दिलीप भड, डॉ. राजश्री चांदोरकर, रूपाली शेठ, कुमार जोगळेकर उपस्थितीत होते.
रायगड जिल्हा परिषदेचे कार्यक्रम व्यवस्थापक जयवंत गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या कार्यक्रमात कौस्तुभ ताम्हणकर यांनी घनकचरा व्यवस्थापन याबद्दल तसेच कचरा निर्माण होऊ नये त्याचे पैशांमध्ये कसे रूपांतर करावे याबद्दल माहिती दिली. अशा प्रकारचे कार्यक्रम अलिबाग परिसरात इतर ठिकाणीही आयोजित करण्याचा मानस डॉ राजेंद्र चांदोरकर यांनी व्यक्त केला.