भाजपचे विनोद घरत यांनी दणका देताच खारघरच्या मैदानातील कचरा डेपो हटवला

पनवेल : प्रतिनिधी

कोरोनाचे संकट असताना खारघरमध्ये पावसाळ्याच्या सुरुवातीलाच कचरा डेपो बनवण्याचा ठेकेदार आणि प्रशासनाचा प्रयत्न भाजपचे खारघर तळोजा मंडळ युवा मोर्चा अध्यक्ष विनोद घरत आणि त्यांच्या सहकार्‍यांनी उधळून लावला. त्याबद्दल खारघरवासीयांनी भाजपच्या शिलेदारांना धन्यवाद दिले आहेत.

पनवेल महापालिका क्षेत्रातील खारघरची ओळख स्मार्ट सिटी म्हणून आहे. पनवेल महापालिका क्षेत्रातील कचरा ठेकेदार कंपनी पहिल्यापासून घोट येथे नेऊन टाकत होती. काही दिवसांपूर्वी शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी त्या ठिकाणी कचरा टाकण्यास विरोध केला. त्यामुळे शहरातील कचरा उचलणार्‍या ठेकेदाराने खारघरमधील पेठपाडा मेट्रो स्टेशनजवळ नरसी मनजी कॉलेजसमोरील मैदानात कचरा टाकण्यास सुरुवात केली. दोन दिवसांतच त्या ठिकाणी कचर्‍याचे डोंगर उभे राहिले. त्यातच पाऊस पडल्याने या कचर्‍याची दुर्गंधी पसरली. आजूबाजूच्या सोसायटीतील नागरिकांना त्याचा त्रास होऊ लागला. त्यामुळे साथीच्या रोगांचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता निर्माण झाली होती. 

या पार्श्वभूमीवर सोसायटीतील नागरिकांनी भाजपचे खारघर तळोजा मंडळ युवा अध्यक्ष विनोद घरत यांच्या ही गोष्ट निदर्शनास आणून दिली. त्यांनी नगरसेवक अभिमन्यू पाटील तसेच रितेश रघुराम यांच्यासोबत गुरुवारी (दि. 11) संध्याकाळी तेथे जाऊन कचरा टाकण्यासाठी आलेल्या गाड्या अडवून प्रशासनाला जाब विचारल्यावर ठेकेदाराने शुक्रवारपासून कचर्‍याच्या गाड्या त्या ठिकाणी आणणे बंद करून तेथील कचरा उचलण्यासही सुरुवात केली आहे.

खारघरची ओळख स्मार्ट सिटी असताना येथील मैदानावर कचर्‍याचे डोंगर उभे केलेले पाहून धक्काच बसला. परिसरात दोन दिवस दुर्गंधी सुटल्याने आम्ही हैराण झालो होतो. कोरोनाचा संसर्ग होत असताना अशा प्रकारे कचरा टाकणे पावसाळ्याच्या सुरुवातीलाच रोगराईला आमंत्रण देणारे होते. याबाबत आम्ही विनोद घरत यांना माहिती दिली. त्यांच्यामुळे येथे कचरा टाकणे बंद करून ठेकेदाराने कचरा उचलण्यासही आज सुरुवात केली आहे.

-रिया आहुजा, प्रोव्हजी कॉम्प्लेक्स, खारघर

Check Also

Midi Bbb Company Profile Bbb

Posts Midi Health Secures $14M Money To take Professional Midlife Care for Women 40+ Each …

Leave a Reply