चंद्रपूर ः प्रतिनिधी
तापमानात अचानक झालेल्या या वाढीमुळे सामान्य नागरिक चांगलेच हैराण झाले आहेत. राज्यात काही ठिकाणी मागील आठवड्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे तापमान खाली आले होते, मात्र तापमानाने उसळी घेतली आहे. राजस्थान आणि गुजरातमधून येणार्या उष्ण वार्यांमुळे मध्य भारतात ही उष्णता वाढ झाल्याचे विशेषज्ञांचे मत आहे.
राज्यात तापमानात दिवसेंदिवस वाढ होत असून, चंद्रपूरच्या तापमानाचा पारा 43.8 अंशांवर गेला. या मोसमातील हे उच्चांकी तापमान आहे. विशेष म्हणजे चंद्रपूर हे जगातील उच्चांकी तापमान असलेल्या शहरात चौथ्या क्रमांकावर पोहचले. मुंबईचा पाराही वधारला आहे. राजस्थानकडून कोरडे वारे वाहत असल्याने महाराष्ट्रात उष्णतेची लाट आल्याची माहिती हवामान खात्याचे उपमहासंचालक जयंता सरकार यांनी दिली.
Check Also
रायगड तायक्वांडो असोसिएशनतर्फे बेल्ट परीक्षा उत्तीर्ण, आंतरराष्ट्रीय खेळाडूंचा गौरव
आमदार प्रशांत ठाकूर यांचा विशेष सत्कार पनवेल : रामप्रहर वृत्तरायगड तायक्वांडो असोसिएशनच्या वतीने बेल्ट परीक्षेत …