Breaking News

पनवेलमध्ये शिवकल्याण राजा कार्यक्रम उत्साहात

लोकनेते रामशेठ ठाकूर यांची उपस्थिती

पनवेल : रामप्रहर वृत्त
हिंदवी स्वराज्याचे संस्थापक व आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या 350व्या राज्याभिषेक वर्षानिमित्त पनवेलमध्ये शिवकाळ अवतरला… निमित्त होते स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर, शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे आणि पं. हृदयनाथ मंगेशकर यांनी निर्मिलेल्या शिवकल्याण राजा या महानिर्मितीमधील गीतांवर नेत्रदीपक नृत्य प्रस्तुती आणि सोबत श्रुतीदायी शिवचरित्र कथनचा… या कार्यक्रमास शिवप्रेमी नागरिकांचा प्रतिसाद लाभला.
भाजपचे मावळ लोकसभा निवडणूक प्रमुख आमदार प्रशांत ठाकूर आणि पनवेल महापालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली आर्च इंटरप्राईजेस आयोजित, नुपूर कथक अकादमी प्रस्तुत आणि भारतीय जनता पक्ष सांस्कृतिक प्रकोष्ठ उत्तर रायगडच्या संयुक्त विद्यमाने शनिवारी (दि.17) पनवेल शहरातील आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात हा कार्यक्रम सादर झाला.
यंदाचे या कार्यक्रमाचे दुसरे वर्ष होते. शिवजयंतीनिमित्त याचे सलग चार प्रयोग सादर करण्यात आले. या वेळी शिवचरित्राचे कथन सुविख्यात वृत्त निवेदक श्रीराम केळकर यांनी केले. कार्यक्रमास माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी भेट देत कौतुक केले.
या वेळी माजी उपमहापौर चारुशीला घरत, भाजप महिला मोर्चा पनवेल शहर अध्यक्ष राजश्री वावेकर, माजी नगरसेविका वृषाली वाघमारे, सांस्कृतिक सेल जिल्हाध्यक्ष अभिषेक पटवर्धन, सहसंयोजक गणेश जगताप, पनवेल शहर अध्यक्ष वैभव बुवा, विनायक मुंबईकर, सारस्वत बँकेचे डीजीएम कुलकर्णी यांच्यासह इतर मान्यवर, पदाधिकारी उपस्थित होते.

Check Also

खासदार सुनील तटकरे यांचा उमेदवारी अर्ज दाखल

महायुतीकडून विजयाचा निर्धार अलिबाग : प्रतिनिधी रायगड लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार खासदार सुनील तटकरे यांनी …

Leave a Reply