Breaking News

सिडकोच्या द्रोणागिरी, कळंबोली येथील कोविड समर्पित रुग्णालयांचे ई-लोकार्पण

नवी मुंबई, पनवेल : सिडको वृत्तसेवा, प्रतिनिधी

पनवेल व उरण परिसरातील कोविडबाधित रुग्णांच्या उपचारासाठी सिडको महामंडळातर्फे कळंबोली सेक्टर-5ई आणि द्रोणागिरी सिडको प्रशिक्षण केंद्र येथे उभारण्यात आलेल्या सुसज्ज कोविड समर्पित रुग्णालयांचे शुक्रवारी (दि. 2) राज्याचे नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ऑनलाइन ई-लोकार्पण करण्यात आले. या वेळी कळंबोली येथील कोविड समर्पित केंद्राचे पनवेल महापालिकेकडे हस्तांतरण करण्यात आले. या कार्यक्रमाला रायगडच्या पालकमंत्री आदिती तटकरे, खासदार श्रीरंग बारणे, आमदार निरंजन डावखरे, पनवेलच्या महापौर डॉ. कविता चौतमोल, उपमहापौर जगदिश गायकवाड, सभागृह नेते परेश ठाकूर, स्थायी समितीचे सभापती संतोष शेट्टी, सिडकोचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक डॉ. संजय मुखर्जी, सहव्यवस्थापकीय संचालक अश्विन मुद्गल, एस. एस. पाटील, पनवेल मनपा आयुक्त सुधाकर देशमुख, नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे मुख्य अभियंता राजेंद्र धायटकर आदींसह नगरसेवक, नगरसेविका, महापालिका व सिडकोचे अधिकारी- कर्मचारी उपस्थित होते. सिडकोने कळंबोली सेक्टर-5ई येथे 60 ऑक्सिजनयुक्त खाटा आणि 12 अतिदक्षता खाटांसह एकूण 72 खाटांचे अत्याधुनिक सोयींनी सुसज्ज असे कोविड-19 समर्पित रुग्णालय उभारले. या रुग्णालयाच्या उभारणीसाठी सिडकोकडून एकूण पाच कोटी खर्च करण्यात आला. कळंबोली येथील कोविड समर्पित केंद्राचे पनवेल महापालिकेकडे हस्तांतरण करण्यात आले. याशिवाय द्रोणागिरी येथील सिडको प्रशिक्षण केंद्रामध्ये नवी मुंबईतील दुसरे 50 ऑक्सिजनयुक्त खाटांचे कोविड-19 समर्पित रुग्णालय उभारण्यात आले आहे. या रुग्णालयाच्या उभारणीकरिता सिडकोकडून 73 लाख खर्च रुपये करण्यात आला असून, हे रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक यांना हस्तांतरण करण्यात आले आहे. या वेळी महापौर डॉ. कविता चौतमोल म्हणाल्या की, पनवेलमधील रुग्णसंख्या आटोक्यात आणण्यासाठी महापालिका आवश्यक त्या उपाययोजना करीत असून वाढत्या रुग्णसंख्येला आरोग्यसेवा मिळण्यासाठी अशा समर्पित केंद्राची आवश्यकता होती. यामुळे शहरातील रुग्णांना बेड मिळविताना अडचण येणार नाही.

Check Also

रायगड तायक्वांडो असोसिएशनतर्फे बेल्ट परीक्षा उत्तीर्ण, आंतरराष्ट्रीय खेळाडूंचा गौरव

आमदार प्रशांत ठाकूर यांचा विशेष सत्कार पनवेल : रामप्रहर वृत्तरायगड तायक्वांडो असोसिएशनच्या वतीने बेल्ट परीक्षेत …

Leave a Reply