रसायनी ः रामप्रहर वृत्त
रसायनी परिसरातील भाजप कार्यकर्त्यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या असून, त्यांना आमदार महेश बालदी यांच्या हस्ते आणि भाजप तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या उपस्थितीत नियुक्तिपत्र प्रदान करण्यात आले. आमदार महेश बालदी, भाजप तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत यांनी शनिवारी (दि. 3) रसायनी परिसराचा दौरा करून सक्रिय भाजप कार्यकर्त्यांची पदावर नियुक्ती करून त्यांना काम करण्याची संधी दिली आहे. त्यानुसार सावळे येथील डॉ. अविनाश गाताडे यांची भाजप गुळसुंदे जि. प. विभागीय अध्यक्षपदी, रमेश शांताराम मालुसरे (आकुलवाडी) यांची युवा मोर्चा तालुका चिटणीसपदी, तुराडे गाव युवा मोर्चा अध्यक्षपदी नितीश लक्ष्मण ठाकूर, लाडिवली गाव युवा मोर्चा अध्यक्षपदी हर्षल कालेकर आणि तुराडे गाव महिला मोर्चा अध्यक्षपदी दीपिका ठाकूर यांची नियुक्ती करून त्यांना नियुक्तिपत्र प्रदान करण्यात आले. या वेळी जि. प. सदस्य अमित जाधव, पं. स. सदस्य भूपेंद्र पाटील, भाजप तालुका उपाध्यक्ष प्रवीण खंडागळे, पोयंजे पं. स. विभाग अध्यक्ष ज्ञानेश्वर सुर्वे, तुराडे ग्रामपंचायतीचे सरपंच चंद्रकांत भोईर, सावळे ग्रामपंचायतीचे सरपंच प्रशांत माळी, माजी सरपंच शिवाजी माळी, संतोष माळी, सदस्य सतीश म्हसकर, सुरेखा कुरंगळे, रश्मी गाताडे, प्रगती जांभूळकर, माजी उपसरपंच अमृता म्हसकर, गुळसुंदे ग्रामपंचायतीचे उपसरपंच शांताराम मालुसरे, सदस्य मनोज पवार, प्रभावती कालेकर, पोसरी ग्रामपंचायतीच्या सरपंच भावना जोशी, उपसरपंच सतीश पाटील, कळसखंड ग्रामपंचायतीचे माजी प्रभारी सरपंच अनिल पाटील, वावेघर ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच विलास माळी, तसेच गणेश आगिवले, प्रवीण ठाकूर, धनाजी पाटील, आत्माराम हातमोडे, लक्ष्मण गोडिवले, रोहिदास तोंडे, जगन्नाथ पवार, रवी राठोड, गोपाळ पाटील आदी पदाधिकारी व कार्यकर्त्यांसह बूथ अध्यक्ष, शक्तिकेंद्र प्रमुख उपस्थित होते. नवनियुक्त पदाधिकार्यांचे अभिनंदन करून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.