Breaking News

राजू शेट्टी यांचा मविआ सरकारवर भ्रष्टाचाराचा आरोप

पंढरपूर : प्रतिनिधी

महाराष्ट्रात कोरोना रुग्णसंख्येने उच्चांक गाठला असताना लॉकडाऊनची शक्यता व्यक्त केली जात आहे. भाजप, मनसेसह अन्य पक्षांनी राज्यातील लॉकडाऊनला विरोध दर्शवला आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनीही लॉकडाऊनला विरोध केला आहे. मागील लॉकडाऊन काळात मोठा भ्रष्टाचार झाल्याचे सांगत महाविकास आघाडीतील प्रमुख तीनही पक्षांची भूमिका पटत नसल्याचे ते म्हणाले. राजू शेट्टी पंढरपुरात यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्यांनी लॉकडाऊनला तीव्र विरोध दर्शवित महाविकास आघाडी सरकारवर टीका केली. लॉकडाऊन काळात मोठा भ्रष्टाचार झाला. चार रुपयांचा मास्क 40 रुपयाला विकला जातो. हे नेमके काय आहे, ते सरकारने सांगायला हवे. गेल्या वर्षीचे बजेट कोरोनासाठी वापरले. त्यात मोठा भ्रष्टाचार झाला आहे. त्याचा हिशोब सरकारने द्यावा, अशी मागणीही शेट्टी यांनी केली. ‘आधी शेतमालाला किंमत द्या. रोजगार बुडणार आहे, त्यांना भरपाई द्या. ज्यांचा व्यवसाय बुडाला, त्यांना भरपाई द्या आणि मगच लॉकडाऊन करा. आमचे काही म्हणणे राहणार नाही. नुसते लॉकडाऊन करतो म्हणणे योग्य नाही. त्यापेक्षा सरकारने आम्हाला आमच्या नशीबावर सोडावे. आमचे आम्ही पाहून घेऊ, असे शेट्टी उद्वेगाने म्हणाले.

Check Also

केळवणे येथे आमदार महेश बालदींच्या प्रचाराचा शुभारंभ

पनवेल : रामप्रहर वृत्त भारतीय जनता पक्ष केळवणे येथे उरण मतदार संघाचे दमदार आमदार महेश …

Leave a Reply