Breaking News

धोनीला तीन विक्रम मोडण्याची संधी

चेन्नई : वृत्तसंस्था
गेल्या आयपीएलमधील अपयश मागे टाकून चेन्नई सुपर किंग्सला (सीएसके) कर्णधार महेंद्रसिंह धोनी आयपीएल 2021 गाजवण्यासाठी सज्ज झाला आहे. त्याला तीन मोठे विक्रम खूणावत आहेत.
महेंद्रसिंह धोनी हा आयपीएलमधील सर्वांत यशस्वी कर्णधारांपैकी एक आहे. त्याच्या नेतृत्वाखाली चेन्नई सुपर किंग्सने अनेक विक्रम केले आहेत. आयपीएल 2020मध्ये सीएसकेला साजेशी कामगिरी करता आलेली नाही आणि इतिहासात प्रथमच धोनीचा संघ प्ले ऑफसाठी पात्र ठरला नाही. धोनीने यूएईत झालेल्या आयपीएलमध्ये 14 सामन्यांत फक्त 200 धावा केल्या. 13 वर्षांच्या इतिहासातील ही त्याची सर्वांत निचांकी कामगिरी ठरली, पण यंदा धोनी नव्या जोमाने मैदानात उतरणार आहे.
आयपीएलमध्ये धोनीच्या नावावर विविध विक्रम आहेत. यामध्ये आयपीएलचे सर्वाधिक 204 सामने खेळणारा खेळाडू, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरुद्ध सर्वाधिक 832 धावा, सर्वाधिक 209 षटकार मारणारा भारतीय फलंदाज, 100 विजय मिळवणारा एकमेव कर्णधार, 6 एप्रिल 2013 ते 14 एप्रिल 2019 या कालावधीत सलग 85 सामन्यांत नेतृत्व (गौतम गंभीर-107नंतर ही दुसरी सर्वोत्तम कामगिरी), डेथ ओव्हरमध्ये (17 ते 20 षटके) सर्वाधिक 141 षटकार यांचा समावेश आहे.

हे आहेत ते विक्रम

  • 179 धावा करताच तो ट्वेण्टी-20मध्ये सात हजार धावांचा पल्ला गाठेल.
  • 14 षटकार मारताच चेन्नई सुपर किंग्सकडून आयपीएलमध्ये षटकारांचे द्विशतक पूर्ण होईल.
  • दोन बळी मिळविल्यानंतर आयपीएलमध्ये धोनीच्या नावावर बळींचे दीडशतक पूर्ण होईल. असा विक्रम करणारा तो पहिला यष्टिरक्षक ठरले.

Check Also

सौ. शकुंतला रामशेठ ठाकूर यांना यमुना स्त्री सन्मान पुरस्कार प्रदान

सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातील भरीव योगदानाचा गौरव पनवेल ः रामप्रहर वृत्तइतिहासात तसेच आजच्या आधुनिक युगातही अनेक …

Leave a Reply