Breaking News

पोलादपुरात स्ट्रॉबेरीची शेती

पोलादपूर : प्रतिनिधी

मुंबईतील अनेक वर्षांच्या कापड व्यापाराला कायमचा रामराम करून पोलादपूर तालुक्यातील गावाकडे आलेले रामचंद्र दाजी कदम उर्फ कदम यांनी स्ट्रॉबेरीची शेती केली आहे. स्ट्रॉबेरीचे आकर्षक रूप पाहून पेरूच्या पिकाला पुरामुळे झालेले नुकसान भरून येण्याची आशा कदम यांना आहे.

रायगड जिल्ह्याच्या पोलादपूर तालुक्यातील बोरज गावाच्या हद्दीत प्रयोगशील शेतकरी रामचंद्र कदम यांच्या शेतात अतिवृष्टी व पुराचे पाणी शिरल्याने पेरूची बहुतांशी झाडे वाहून गेली. पेरूच्या शेतीला बसलेल्या या पुराच्या फटक्यातून सावरण्यासाठी कदम यांनी चक्क महाबळेश्वर येथून स्ट्रॉबेरीची रोपे आणून ही शेती करण्याचा निर्णय घेतला.

कोकणातील हवामानात स्ट्रॉबेरीची शेती यशस्वी होत नसल्याचा अनुभव असताना शेतीमध्ये वेगवेगळे प्रयोग करणार्‍या कदम यांचे धाडस अनेकांना आश्चर्यचकित करणारे होते. उत्तम मशागत करून पावसापासून आणि उन्हापासून रोपे वाचवत, तसेच हवेतील गारवा टिकवत पिकाची त्यांनी जोपासना केली. त्यात त्यांना अखेर यश आले आहे.

Check Also

रामबाग उद्यानाचा रविवारी वर्धापन दिन सोहळा

पारंपरिक लोकगीते व कोळीगीतांचा बहारदार कार्यक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त दुबईच्या धर्तीवर पनवेल तालुक्यातील न्हावेखाडी …

Leave a Reply