Breaking News

हनुमा विहारी ‘वार्विकशायर’कडून खेळणार

नवी दिल्ली ः वृत्तसंस्था

इंडियन प्रीमियर लीगच्या फ्रँचायझींनी दुर्लक्ष केल्यानंतर भारतीय कसोटी स्पेशालिस्ट फलंदाज हनुमा विहारी इंग्लंडमध्ये सहा कसोटी सामन्यांच्या आगामी दौर्‍याच्या तयारीसाठी कौंटी संघ वार्विकशायरसोबत जोडला जाणार आहे. आयपीएलनंतर भारतीय संघाला इंग्लंडमध्ये विश्व कसोटी चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये न्यूझीलंडच्या आव्हानाला सामोरे जायचे आहे. संघाला त्यानंतर इंग्लंडविरुद्ध पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेत सहभागी व्हायचे आहे. विहारी इंग्लंडमध्ये दाखल झाला असून, बर्मिंघममध्ये वार्विकशायर कौंटी संघाकडून या मोसमात किमान तीन सामने खेळणार आहे. बीसीसीआयच्या एका अधिकार्‍याने या वृत्ताला दुजोरा दिला आहे.  विहारीने यापूर्वी 2019मध्ये दिल्ली कॅपिटल्सचे प्रतिनिधित्व केले होते, पण त्यानंतर त्याच्यावर कसोटी स्पेशालिस्टचा शिक्का लागल्यामुळे आयपीएल लिलावामध्ये त्याच्यावर कुठल्याही फ्रँचायझीने बोली लावली नाही. या 27 वर्षीय फलंदाजाने भारतातर्फे 12 कसोटींमध्ये 32पेक्षा अधिक सरासरीने 624 धावा केल्या आहेत. त्याने या कालावधीत एक शतक व चार अर्धशतके ठोकली आहेत. भारतातर्फे विहारी शेवटच्या वेळी सिडनी कसोटीत खेळला होता. स्नायूच्या दुखापतीने त्रस्त असताना त्याने चार तास संघर्षपूर्ण खेळी करीत नाबाद 123 धावा करीत अश्विनसोबत कसोटी सामना अनिर्णित राखण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती.

Check Also

अनधिकृत व्यापार जिहादवर कडक कारवाई करा

आमदार प्रशांत ठाकूर यांची नागपूर अधिवेशनात जोरदार मागणी नागपूर : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका हद्दीत …

Leave a Reply