Breaking News

नवीन पनवेल ते नेरेपर्यंतचा रस्ता लवकरच होणार दुरूस्त

जि. प. सदस्य अमित जाधव यांना अधिकार्‍यांचे आश्वासन

पनवेल ः रामप्रहर वृत्त

नवीन पनवेल (आदई सर्कल) ते नेरे गावापर्यंतचा रस्ता नादुरूस्त झाला आहे. हा रस्ता दुरूस्त करण्याबाबत राजिप सदस्य तथा भाजपचे पक्षप्रतोद अमित जाधव यांनी पनवेल सार्वजनिवक बांधकाम विभागाशी पत्रव्यवहार केल्यानंतर अखेर त्यांच्या पाठपुराव्याला यश आले आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने पुढील दोन दिवसांत रस्त्याचे काम सुरू करणार असल्याचे आश्वासन दिले आहे.नवीन पनवेल (आदई सर्कल) ते नेरे गावापर्यंतच्या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. या खड्ड्यांमुळे अपघाताच्या घटना घडत आहेत. त्यामुळे या रस्त्याच्या दुरूस्तीची मागणी करणारे पत्र राजिप सदस्य अमित जाधव यांनी पनवेल सार्वजनिक बांधकाम विभागाला दिले होते.

Check Also

पनवेलमध्ये भाजप स्थापना दिन उत्साहात साजरा

पनवेल : रामप्रहर वृत्तजगातील सर्वात जास्त सदस्य असलेल्या भारतीय जनता पक्षाचा स्थापना दिवस सोमवारी (दि. …

Leave a Reply