Breaking News

केंद्रीय पथकाकडून महाराष्ट्रात कोरोना परिस्थितीचा आढावा

अमरावती : कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर केंद्र शासनाच्या आरोग्य पथकाने गुरुवारी (दि. 8) सुपर स्पेशालिटी रुग्णालयस्थित जिल्हा कोविड रुग्णालयाची पाहणी केली. दिल्लीच्या एम्स रुग्णालयाचे तज्ज्ञ डॉ. अमितेश गुप्ता व डॉ. संजय राय यांचा या पथकात समावेश होता. कोरोना साथीवर नियंत्रणासाठी सर्व नागरिकांकडून नियमांचे पालन होणे आवश्यक आहे. तसे न झाल्यास तिसर्‍या लाटेचा धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे मास्कचा वापर, सुरक्षित अंतर व हातांची स्वच्छता या नियमांचे पालन होण्याच्या दृष्टीने प्रयत्न व्हावेत, असे निर्देश त्यांनी दिले. तत्पूर्वी त्यांनी प्रशासनाकडून कोरोना उपाययोजनांबाबत बैठकीद्वारे माहिती घेतली. जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांच्यासह अन्य अधिकारी या वेळी उपस्थित होते. जिल्ह्यातील कोरोना उपाययोजनांबाबत नवाल यांनी सादरीकरण केले.

Check Also

कामोठ्यातील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे पदाधिकारी भाजपमध्ये

पनवेल : रामप्रहर वृत्त विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे कामोठे शहर अध्यक्ष किशोर मुंडे, …

Leave a Reply