Breaking News

‘भारतरत्नांची चौकशी करणारे ‘रत्न’ कुठेही सापडणार नाहीत’

मुंबई : शेतकरी आंदोलनाला समर्थन देणार्‍या परदेशातील सेलिब्रिटींविरोधात ट्विट करणार्‍या भारतातील सेलिब्रिटींच्या ट्विटची चौकशी करण्याचा निर्णय महाराष्ट्र सरकारने घेतला आहे. गृहमंत्री अनिल देशमुख यांनी या संदर्भात चौकशीचे आदेश दिले आहेत. राज्य सरकारच्या या निर्णयावर विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सडकून टीका केली आहे. भारतरत्नांची चौकशी करणारे असे ‘रत्न’ देशात कुठेही सापडणार नाहीत तसेच चौकशी करण्याची मागणी करणारे आणि ती मागणी मान्य करणारे यांच्या मानसिक स्थितीचीच चौकशी केली पाहिजे, अशा शब्दांत त्यांनी सरकारवर निशाणा साधला आहे. दिल्लीत सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाबाबत सेलिब्रिटींनी केंद्र सरकारच्या दबावाखाली ट्विट केले का, याची चौकशी राज्याचे गुप्तहेर विभाग करणार आहे. या निर्णयावरून जोरदार टीका होत आहे.

Check Also

श्याम बेनेगल; आशय अन् पोस्टर्सचे वैशिष्ट्य जपणारे दिग्दर्शक

अंकूर असो की निशांत वा मंडी… चित्रपटाचे नाव घेताच त्या चित्रपटाचे दिग्दर्शक श्याम बेनेगल आहेत …

Leave a Reply