Breaking News

नागोठणे शहरात औषध फवारणी

नागोठणे : प्रतिनिधी

कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून नागोठणे ग्रामपंचायतीकडून रविवार (दि. 11) पासून संपूर्ण शहरात  सोडियम हैपो क्लोराईड या औषधाची फवारणी सुरू करण्यात आली आहे.

रविवारी ग्रामपंचायत कार्यालय, पोलीस ठाणे, एसटी बस स्थानक, प्राथमिक आरोग्य केंद्र येथून औषध फवारणी सुरू करण्यात आली. शहरातील सर्व आळी, चौक याठिकाणी ही फवारणी करण्यात येणार असून सर्व नागरिकांनी घराबाहेर न पडता ग्रामपंचायतीला सहकार्य करावे, असे आवाहन सरपंच डॉ. मिलिंद धात्रक यांनी केले आहे.

Check Also

रामबाग उद्यानाचा रविवारी वर्धापन दिन सोहळा

पारंपरिक लोकगीते व कोळीगीतांचा बहारदार कार्यक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त दुबईच्या धर्तीवर पनवेल तालुक्यातील न्हावेखाडी …

Leave a Reply