पनवेल : येथील विद्या रघुनाथ चंदने यांचे वयाच्या 73व्या वर्षी देहावसान झाल्याने त्यांच्या कुटुंबीयांनी उत्तरकार्याचे औचित्य साधून देहदान व अवयवदानाचे महत्त्व सांगणारा कार्यक्रम शहरातील मिडलक्लास सोसायटीच्या गणेश मंदिर हॉलमध्ये आयोजित केला होता. रोटरी क्लबचे दिलीप देशमुख यांनी या वेळी प्रबोधन केले. कै. विद्या चंदने यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ तुळशीच्या रोपांचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमाची सांगता शहीद जवानांना श्रद्धांजली वाहून करण्यात आली.
Check Also
अन्यायाविरोधात एकत्रित आवाज महत्त्वाचा -लोकनेते रामशेठ ठाकूर
मुलीवर अत्याचार करणार्या आरोपीला अटक; आरपीआयचे आमरण उपोषण मागे पनवेल : रामप्रहर वृत्त ज्या ज्या …