Thursday , March 23 2023
Breaking News

गोवारी विद्यालयात निरोप समारंभ

पनवेल : वार्ताहर

कामोठे वसाहतीतील ह.भ.प. श्री. दामाजी गणपत गोवारी विद्यालयातील दहावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ शाळेच्या प्रांगणात झाला. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून स्वामी म्हात्रे, जे. पी.  ठाकूर, विठूशेठ गोवारी, संस्थेचे चेअरमन सूरदास गोवारी, शांताराम भगत, दत्तात्रेय सावंत, हरिदास गोवारी, प्रदीप गोवारी आदी उपस्थित होते. मान्यवरांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. शिक्षक व विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त केले. मुख्याध्यापक विजय पाटील यांनी आभार मानले. काश्मीर येथे घडलेल्या घटनेचा सर्वांनी निषेध करून शहिदांना श्रद्धांजली अर्पण केली.

Check Also

नैना प्राधिकरणाने जनहिताबाबतची भूमिका स्पष्ट करावी

आमदार प्रशांत ठाकूर यांची अधिवेशनात मागणी पनवेल ः रामप्रहर वृत्त नैना प्राधिकरण जर जनतेच्या हिताचा …

Leave a Reply