Breaking News

सुधागडातील वावळोली येथे कोविड सेंटर सुरू

पाली : प्रतिनिधी  

सुधागड तालुक्यात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासनाने वावळोली येथील कोविड केअर सेंटर पुन्हा सुरू केले आहे. पाली प्राथमिक आरोग्य केंद्रात सुरू असलेले कोविड लसीकरण आता येथे सुरू करण्यात आले आहे.

सुधागड तालुक्यात बुधवारी (दि. 14) कोरोनाचे 06 रुग्ण आढळले आहेत. सध्या तालुक्यात कोरोनाचे तब्बल 106 सक्रिय रुग्ण असून यातील 102 गृहविलविकरणमध्ये एक रुग्ण वावळोली कोविड केअर सेंटर, एक रुग्ण जिल्हा रुग्णालय अलिबाग व दोन रुग्ण जिल्हा समर्पित कोविड केअर सेंटरमध्ये उपचार घेत आहेत. अशी माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. शशिकांत मढवी यांनी दिली.

वावळोली येथे कोविड केअर सेंटर सुरू झाल्याने नागरिकांची गैरसोय थांबणार आहे. येथे ऑक्सिजनची व्यवस्था करण्यात यावी, असे सिद्धेश्वर सरपंच उमेश यादव यांनी सांगितले.

Check Also

अनधिकृत व्यापार जिहादवर कडक कारवाई करा

आमदार प्रशांत ठाकूर यांची नागपूर अधिवेशनात जोरदार मागणी नागपूर : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका हद्दीत …

Leave a Reply