Breaking News

राजस्थानचे पंजाबविरुद्ध बल्ले बल्ले!

शेवटच्या षटकात साकारला थरारक विजय

मुंबई ः प्रतिनिधी

मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर रंगलेल्या आयपीएलमधील साखळी सामन्यात राजस्थान रॉयल्सने पंजाब किंग्जविरुद्ध शेवटच्या षटकात विजय मिळविला. दक्षिण आफ्रिकेचे राजस्थानकडून खेळणारे डेव्हिड मिलर,  आणि यंदाच्या आयपीएलमध्ये सर्वांत महागडा खेळाडू म्हणून चर्चेत असलेल्या ख्रिस मॉरिसने सामना जिंकवूला दिला.

दिल्ली कॅपिटल्सने पहिली फलंदाजी करताना राजस्थान रॉयल्ससमोर विजयासाठी 148 धावांचे माफक आव्हान ठेवले होते. त्यामुळे वानखेडेच्या खेळपट्टीवर राजस्थानच्या फलंदाजांना हे आव्हान पार करणे फारसे कठीण जाणार नाही, असाच अंदाज वर्तविला जात होता, पण दिल्लीने हार मानलेली नव्हती. दिल्लीच्या याच लढाऊ खेळीमुळे सामना शेवटच्या षटकापर्यंत चुरशीचा ठरला.

राजस्थानने डावाच्या सुरुवातीलाच तीन गडी गमावले. यामध्ये दोघे सलामीवीर आणि पहिल्या सामन्यातील शतकवीर कर्णधार संजू सॅमसन यांचा समावेश होता. त्यापाठोपाठ आठव्या षटकात शिवम दुबे आणि दहाव्या षटकात रियान पराग यांनी तंबूचा रस्ता धरला. या वेळी राजस्थानची धावसंख्या होती 10 षटकांमध्ये 42 धावा.

शिवम दुबे बाद झाल्यावर डेविड मिलर मैदानात आला. त्याने सुरुवात सावध केली आणि खेळपट्टीवर जम बसवला. दहाव्या षटकात 42 धावांवर असणारा राजस्थानचा धावफलक पुढच्या पाच षटकांमध्ये मिलरने 104 धावांपर्यंत नेला. सोळाव्या षटकात आवेश खानला त्याने दोन लागोपाठ षटकारदेखील ठोकले, पण पुढच्याच चेंडूवर असाच फटका खेळताना मिलर बाद झाला. दोन उत्तुंग षटकार आणि सात चौकारांनी मिलरने 43 चेंडूंमधली त्याची 62 धावांची खेळी सजवली. आता राजस्थानला विजयासाठी 25 चेंडूंमध्ये 44 धावा करायच्या होत्या आणि मैदानात होता आयपीएलच्या इतिहासातील सर्वांत महागडा खेळाडू ख्रिस मॉरिस!

ख्रिस मॉरिस मैदानात आला तेव्हा राहुल तेवतियाने समोरून आक्रमक फटकेबाजी सुरू केली होती, पण मॉरिसदेखील मिलरप्रमाणेच सुरुवातीला सावध होता. 17 चेंडूंमध्ये 19 धावा करून तेवतिया बाद झाला आणि सगळी जबाबदारी मॉरिसवर येऊन पडली. मॉरिसनेही हळूहळू धावांचा वेग वाढवला. शेवटच्या षटकात राजस्थानला विजयासाठी 13 धावांची गरज होती. स्ट्राईकवर असणार्‍या मॉरिसने पहिल्या रबाडाच्या पहिल्या चेंडूवर दोन धावा केल्या. पाच चेंडूत 12 धावा शिल्लक असताना त्याने रबाडाला एक सणसणीत षटकार खेचला. त्याच्या पुढचा चेंडू निर्धाव गेला. तीन चेंडूंमध्ये सहा धावा जिंकण्यासाठी शिल्लक असताना सामना सुपर ओव्हरमध्ये जातो की काय असे वाटू लागले होते, पण मॉरिसने पुन्हा एक उत्तुंग षटकार खेचला आणि सामना संपविला. 18 चेंडूंमध्ये मॉरिसने 36 धावांची खणखणीत खेळी साकारली. यामध्ये चार तितक्याच खणखणीत षटकारांचा समावेश होता.

Check Also

अनधिकृत व्यापार जिहादवर कडक कारवाई करा

आमदार प्रशांत ठाकूर यांची नागपूर अधिवेशनात जोरदार मागणी नागपूर : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका हद्दीत …

Leave a Reply