Breaking News

‘पेणमधील खारबंदिस्तीची कामे चांगल्या प्रतिची करा‘

पेण : प्रतिनिधी

पेण तालुक्यातील वढाव-भाल, नारवेल-बेनवले असे खारबंदिस्तीचे काम गेली काही वर्षे सुरू असून हे काम निकृष्ठ असल्याबाबतच्या तक्रारी ग्रामस्थांनी केल्यानंतर या खारबंदिस्तीच्या कामाची पाहणी पेणचे आमदार रविशेठ पाटील यांनी संबंधित ठेकेदारासोबत केली. या वेळी त्यांनी काम चांगल्या प्रतिचे करण्याच्या सुचना संबंधित ठेकेदारांना दिल्या आहेत.

दरम्यान, ग्रामस्थांनी संबंधित ठेकेदाराकडून काहीजण टक्केवारी मागत असल्याच्या तक्रारी केल्यावर ठेकेदाराने कोणासही टक्केवारी देऊ नये. टक्केवारी मागणार्‍याचे नाव सांगावे असे रविशेठ पाटील यांनी ग्रामस्थांसोबत संबधित ठेकेदाराला सुनावले. दरम्यान खारबंदिस्ती ही गावसुरक्षेसाठी अत्यावश्यक व महत्वाची असल्याने त्याचे काम चांगल्या दर्जाचे व्हावे, अशी अपेक्षा व्यक्त केली.

यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत बोलताना रविशेठ पाटील यांनी सांगितले की, आमदार महेंद्र दळवी व माझे कौटुंबिक संबंध आहेत. त्यांच्याबद्दल मी असे कोणतेही वक्तव्य केलेले नाही. माझ्या नावाने खोटा व्हिडिओ समाज माध्यमांवर पसरवण्यात आला आहे. पेण नगरपालिकेच्या होऊ घातलेल्या निवडणुकीला डोळ्यासमोर ठेवून आपली राजकीय पोळी भाजून घेण्यासाठी काही राजकीय पक्षांनी शिवसेना व भाजपमध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे पण तो सफल होणार नाही, असा खुलासा पेणचे आमदार रवीशेठ पाटील यांनी पत्रकार परिषदेत केला.

Check Also

सौ. शकुंतला रामशेठ ठाकूर यांना यमुना स्त्री सन्मान पुरस्कार प्रदान

सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातील भरीव योगदानाचा गौरव पनवेल ः रामप्रहर वृत्तइतिहासात तसेच आजच्या आधुनिक युगातही अनेक …

Leave a Reply