Breaking News

मुरूडमधील शिबिरात 170 जणांचे रक्तदान

मुरूड : प्रतिनिधी

अलिबाग मुरूड मेडिकल असोसिएशन, जंजिरा मेडिकल असोसिएशन व जय श्रीराम नागरी सहकारी पतसंस्था यांच्या संयुक्त विद्यमाने मुरूडमधील कल्याणी हॉस्पिटलमध्ये घेण्यात आलेल्या शिबिरात 170 जणांनी रक्तदान केले.

अलिबाग येथील जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या रक्तपेढीच्या सौजन्याने घेण्यात आलेल्या या रक्तदान शिबिराचे उद्घाटन अलिबाग मुरूड मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. मयूर कल्याणी, जय श्रीराम नागरी सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष अ‍ॅड. मोहन तांबडकर  व डॉ. मकबूल कोकाटे यांच्या हस्ते करण्यात आले. रक्तदान केल्यामुळे रक्तातील पेशी वाढण्याची सवय रक्ताला लागते. सत्कार्याला शक्तीची नव्हे तर माणुसकीची गरज आहे, म्हणूनच रक्तदान करा, असे आवाहन डॉ. मयूर कल्याणी यांनी यावेळी केले. या शिबिरात 170 जणांनी रक्तदान केले, त्यामध्ये 18 महिलांचाही समावेश आहे.

जय श्रीराम नागरी सहकारी पतसंस्थेचे उपाध्यक्ष दिलीप जोशी, कोषाध्यक्ष प्रकाश पंड्या, व्यवस्थापक संजय ठाकूर, ब्लडबँक प्रमुख डॉ. दिलीप गोसावी, जंजिरा मेडिकल असोसिएशनचे डॉ. राज कल्याणी, डॉ अमित बेनकर, डॉ. संजय पाटील या वेळी उपस्थित होते.

Check Also

केंद्र सरकार पाच वर्ष टिकेल -खासदार श्रीरंग बारणे

कर्जत ः प्रतिनिधी मला या निवडणुकीत खूप काही शिकता आले. विरोधकांनी जाती जातीत तेढ निर्माण …

Leave a Reply