Breaking News

दिवाळीपासून नवी मुंबईतून जलप्रवासी वाहतूक

आमदार मंदा म्हात्रे यांची माहिती

नवी मुंबई : प्रतिनिधी

बेलापूरच्या आमदार मंदा म्हात्रे यांच्या प्रयत्नाने नवी मुंबई शहर ब्लु इकॉनॉमिक होण्याच्या दिशेने मार्गक्रमण करित आहे. नवी मुंबईतून दिवाळीमध्ये समुद्र मार्गे प्रवाशी वाहतूक सुरू होणार आहे. आधुनिक जेट्टी तिथे सुसज्ज फिश मार्केट प्रकल्पाची सुरुवात नवी मुंबईत होत असून भविष्यात समुद्र संपत्तीतुन हजारो रोजगार निर्माण होणार असल्याचे आमदार मंदा म्हात्रे यांनी वाशी येथील पत्रकार परिषदेत बोलताना सांगितले.

वाशी येथील हॉटेल फोर पॉईंट येथील पत्रकार परिषदेत आमदार मंदा म्हात्रे म्हणाल्या की, जेट्टी व्हिजन, फिश मार्केट, मरिना प्रकल्प, सागरमाला प्रकल्पामुळे शहरात हजारो रोजगार निर्माण होणार असल्याने हे शहर भविष्यात सामुद्रिक व्यवसायाचे भारतातील महत्त्वाचे शहर असणार आहे. तसेच समुद्री पर्यटनाने फ्लोमिंगो दर्शन ही पर्यटकांना एक पर्वणीच ठरणार असून कोस्टल रोड निर्माण करण्यास आपण प्रयत्नशील आहोत. पत्तन विभागामार्फत घणसोली, दिवा ऐरोली येथे जेट्टीचे काम केले आहे. या ठिकाणी वन विभागामार्फत फ्लेमिंगो पार्क विकसित केल्यामुळे येथे फ्लेमिंगो पाहण्यासाठी पर्यटकांची नेहमीच गर्दी असते. या जेट्टीची लांबी व रुंदी वाढविल्यास भरती व ओहोटी या दोन्ही वेळेस मोठ्या प्रमाणात फ्लोमिंगो सफारी होऊ शकते तसेच जलवाहतूकीचे विविध उपक्रम आपण राबविल्यास तेथे पर्यटनास मोठ्या प्रमाणात चालना मिळेल. या करिता घणसोली, ऐरोली, दिवा येथे प्रवाशी जेट्टी उभारण्याचे काम आपण हाती घेतल्याचे आमदार म्हात्रे यांनी सांगितले.

केंद्र सरकारच्या माध्यमातून नेरूळ येथे 110 कोटीचा  सागरमाला जेट्टी प्रकल्प पूर्णत्वास आला असून येत्या दिवाळी मध्ये येथून पूर्ण क्षमतेने प्रवाशी वाहतूक सुरू होईल. बेलापूर येथून प्रवाशी जेट्टी सुरू होणार असून तिथे तिकीट घर आणि इतर सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. जेट्टी प्रवासामुळे नागरिकांचा वेळ वाचणार असून प्रवास सुखकर आणि सुलभ होणार असल्याचे  आमदार म्हात्रे यांनी सांगितले.

वाशी गाव येथील जेट्टीची लांबी व रुंद वाढवण्यासंदर्भात प्रयत्न सुरू असल्याचे सांगितले. वाशी सेक्टर10 सागर विहार येथे सिडकोमार्फत पर्यटकांसाठी हॉवर्ड क्राफ्ट सेवा सुरू होती, परंतु सध्यस्थितीत वरील वाहतूक बंद अवस्थेत असून तेथील परिसराची अत्यंत बिकट अवस्था झाली आहे. या ठिकाणी पर्यटकांची मोठ्या प्रमाणात वर्दळ असून शेकडो पर्यटक तेथे दररोज भेट देत असतात तेथून पर्यटकांसाठी जल वाहतूक सुरू व्हावी त्या करिताच्या मूलभूत सुविधा उपलब्ध व्हाव्यात याकरिता नवी मुंबई वाशी सेक्टर10 येथील सागर विहार येथे काँक्रीट रॅप, पर्यटकांसाठी निवारा शेड व बसण्याची व्यवस्था, टॉयलेट कॅन्टीन व इतर तत्सम सुविधा उपलब्ध करून या भागाचे सुशोभीकरण करण्यात येणार असल्याचे आमदार म्हात्रे यांनी सांगितले.

दिवाळे येथील जेट्टी आणि संलग्न असणारे फिश मार्केट प्रकल्प पूर्ण झाला असून मासेमारी व्यवसायास चालना मिळणार आहे. दिवाळे गाव पर्यटन म्हणून नव्याने विकसित होत असून जेट्टी व्हिजन राबवण्यात येणारे दिवाळे गाव महाराष्ट्रातील प्रथम गाव असल्याचे आमदार म्हात्रे यांनी बोलताना सांगितले.

पत्रकार परिषदेलला भाजप नवी मुंबई महामंत्री निलेश म्हात्रे,  डॉ. राजेश पाटील, विजय घाटे, माजी नगरसेवक दीपक पवार, दिवा कोळीवाडा मच्छिमार सेवा संस्थेचे अध्यक्ष चंदन मढवी, अजित मढवी आदी उपस्थित होते.

Check Also

‘सामना’ पन्नाशीचा झाला…

काही कलाकृतींचे महत्त्व व अस्तित्व हे कायमच अधोरेखित होत असते. ते चित्रपटगृहातून उतरले तरी त्यांचा …

Leave a Reply