Breaking News

एपीएमसीमधील इमारतीला आग

नवी मुंबई : रामप्रहर वृत्त

एपीएमसीमधील कमोडिटी एक्स्चेंज या इमारतीच्या पाचव्या मजल्यावर आग लागल्याची घटना शनिवारी रात्री घडली. इमारतीच्या पाचव्या मजल्यावरील बंद कार्यालयात ही आग लागली होती. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे पाच बंब घटनास्थळी दाखल झाले होते.

शनिवारी रात्री 7.30 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. कमोडिटी एक्स्चेंज या इमारतीच्या पाचव्या मजल्यावरून मोठ्या प्रमाणात आगीचे लोट निघत होते. त्याची माहिती मिळताच अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेतली. इमारत सध्या बंद असल्याने तिथल्या कार्यालयात कोणीही नव्हते. यामुळे जीवितहानी टळली आहे, मात्र आग अधिक भडकल्याने पाचव्या मजल्यावरील कार्यालये जळून खाक झाली आहेत. या आगीचे नेमके कारण कळू शकलेले नाही.

सुमारे एक तासाच्या प्रयत्नानंतर अग्निशमन दलाने आगीवर नियंत्रण मिळवले. त्यामुळे संभाव्य मोठी दुर्घटना टळली आहे. कमोडिटी एक्स्चेंज इमारतीच्या ज्या विंगमध्ये ही आग लागली त्याठिकाणी 150हून अधिक कार्यालये आहेत. त्यामुळे आग अधिक पसरली असती तर मोठी हानी झाली असती.

Check Also

शिवराज्याभिषेक सोहळ्यातून छत्रपती शिवाजी महाराजांच्या सुवर्णकाळाचा अनुभव

पनवेल : रामप्रहर वृत्तउलवे नोडमधील रामशेठ ठाकूर मैदानावर छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या …

Leave a Reply