खारघर : रामप्रहर वृत्त
खारघर येथील रामशेठ ठाकूर वाणिज्य व शास्त्र महाविद्यालयात सोमवारी (दि. 23) व्यवस्थापन विभाग, चर्चासत्र व कार्यशाळा समिती यांच्या संयुक्त विद्यमाने वेबिनार घेण्यात आले.
या वेळी प्रमुख वक्ते म्हणून टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्स मुंबई या संस्थेचे सहाय्यक संचालक डॉ. नीना नंदा उपस्थित ऑनलाईन होत्या. या वेबिनारसाठी प्रमुख वक्त्यांनी बी. एम. एस. विभागातील द्वितीय व तृतीय वर्षाच्या विद्यार्थ्यांना माहिती विश्लेषणाची कौशल्ये व त्यांचा एच. आर. मध्ये योग्य पद्धतीने वापर करणे, सामाजिक माध्यमांच्या सहाय्याने मार्केटिंग करणे व कंपनीमध्ये काम करणार्या कामगारांना प्रशिक्षण देणे याविषयी मोलाचे मार्गदर्शन केले तसेच विद्यार्थ्यांनी त्यांच्या शंका उपस्थित करून त्या शंकांचे निरसन केले.
या कार्यक्रमाच्या शेवटी प्रश्न उत्तरांचे सत्र आयोजित केले. यामध्ये प्रमुख वक्त्याने विद्यार्थ्यांच्या सर्व प्रश्नांची उत्तरे दिली. या वेबिनारचे आयोजन व्यवस्थापन विभागाचे प्रमुख प्रा. रीत ठुले व कार्यशाळा व चर्चासत्र समितीच्या समन्वयक प्रा. प्रेरणा सातव यांनी आयोजन केले व प्रा. नीलम लोहकरे, प्रा. डॉ. फारुक शेक, प्रा. डॉ. धनवी आवटे, प्रा. डॉ. अविनाश जुमारे, प्रा.श्वेता श्रीवास्तव यांनी सहकार्य केले.
प्रस्तुत महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. रूपेंद्र गायकवाड यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले व सत्रासाठी शुभेच्छा दिल्या. या वेबिनारसाठी महाविद्यालयातील अंतर्गत गुणवत्ता सिद्धता कक्षाच्या समन्वयक प्रा. महेश्वरी झिरपे प्राध्यापक वृंद व विद्यार्थी, शिक्षकेतर कर्मचारी यांनी उपस्थिती दर्शवली व सहकार्य केले.
Check Also
पनवेलमध्ये मानवी साखळीद्वारे जोरदार निदर्शने करत बांगलादेश सरकारचा निषेध
पनवेल : रामप्रहर वृत्त बांगलादेशात हिंदूंवरील अत्याचाराविरोधात सकल हिंदू समाज रायगडच्या वतीने मंगळवारी (दि. 10) …