Breaking News

पेणमधील उपप्रादेशिक परिवहन कार्यालय 15 दिवस बंद

कोरोना महामारीचा बसला फटका

पेण : प्रतिनिधी

रायगड जिल्ह्यातील पेण उपप्रादेशिक परिवहन कार्यालय राज्य शासनाच्या आदेशानुसार व कोरोना महामारीचा प्रसार रोखण्यास काही दिवस बंद ठेवण्यात आले आहे. यामुळे आरटीओची ऑनलाइन कागदपत्रे पूर्तता करणारे केंद्र व्यवसायिकांना कोरोना महामारीचा चांगलाच फटका बसलेला दिसून येत आहे.

शासनाच्या आदेशानुसार पेण उप प्रादेशिक परिवहन कार्यालय 15 ते 30 एप्रिल या पंधरा दिवसाच्या कालावधीसाठी बंद करण्यात आले आहे. या दिवसात शिकाऊ, पक्के, दुय्यम, अनुज्ञप्ती, नूतनीकरण तसेच नवीन नोंदणी, वाहनांचे फिटनेस, वाहन हस्तांतरण कर्ज व बोजा उतरवणे इत्यादी कामे पूर्णपणे बंद ठेवण्यात आली असल्याचा बोर्डच उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या बाहेर लावण्यात आला आहे. तर याच कार्यालयातील वरिष्ठ अधिकारी तसेच काही कर्मचार्‍यांना कोरोना संसर्ग झाल्याचे बोलले जात आहे.

Check Also

कामोठे येथील लोकनेते रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलमध्ये दहावीच्या विद्यार्थ्यांचा शुभचिंतन सोहळा

कामोठे : रामप्रहर वृत्तरयत शिक्षण संस्थेच्या कामोठे येथील लोकनेते रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलमध्ये इयत्ता दहावीच्या …

Leave a Reply