Breaking News

औद्योगिक क्षेत्रातील शेकडो कामगार बेरोजगार; पनवेल परिसरातील कामे ठप्प

पनवेल : वार्ताहर

सद्य स्थितीत कोरोनामुळे दिवसेंदिवस परिस्थिती अधिक गंभीर होत चालले आहे. रुग्णांना लागणार्‍या ऑक्सिजनची तूट भरून काढण्यासाठी हॉस्पिटलला लागणार्‍या ऑक्सिजन व्यतिरिक्त औद्योगिक ऑक्सिजन पुरवठा शासनाने बंद केल्यामुळे पनवेल आणि परिसरातील कटिंग आणि फेब्रिकेशन उद्योग पूर्णतः ठप्प झालेले आहेत. त्यामुळे या व्यवसाय मध्ये काम करणारे शेकडो कामगार बेरोजगार झाले आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रुग्णांना लागणाार्‍या ऑक्सिजनची तूट भरून काढण्यासाठी 30 मार्च रोजी सरकारने एक परिपत्रक काढून 80 टक्के हॉस्पिटल व 20 टक्के औद्योगिक कामासाठी ऑक्सिजनचा पुरवठा करावा अशा सुचना दिल्या, परंतु कोरोना रुग्णांची झपाट्याने वाढ होऊ लागल्याने आणखी ऑक्सिजनचा तुटवडा भासू लागला त्यामुळे सरकारने पुन्हा 8 एप्रिलला पुर्ण 100 टक्के ऑक्सिजन पुरवठा हा हॉस्पिटलला करावा, असे परिपत्रक काढून औद्योगिक कारणांसाठी लागणारा ऑक्सिजन पुरवठा बंद केला. त्यामुळे पनवेल आणि परिसरातील शेकडो धातू कटिंग, फॅब्रिकेटिंग कारखाने व छोट्या मोठ्या शेडची कामे ठप्प झाली आहेत. कळंबोली स्टील मार्केट, तळोजा सह पनवेल या ठिकाणी ही कामे मोठ्या प्रमाणावर चालतात. कळंबोली स्टील मार्केटमध्ये प्रामुख्याने हेच व्यवसाय चालतात. पनवेल, कळंबोली सह तळोजा मधील औद्योगिक कटिंग व फॅब्रिकेटिंगला दररोज 1200 ते 1500 ऑक्सिजनची सिलिंडरची गरज भासते. औद्योगिक ऑक्सिजनच्या सिलेंडरचा दर 12 रुपये पर क्युबिक मीटर आहे, तर एका सिलिंडरमध्ये सात क्युबिक मीटर सिलिंडर बसतो याप्रमाणे एका सिलिंडरची किंमत 84 रुपये होते. त्याचबरोबर लोडिंग अनलोडिंग व वाहतूक खर्च जोडला तर हा सिलिंडरचा दर 300 रुपये होतो. पनवेल परिसरामध्ये या उद्योगाला औद्योगिक ऑक्सिजन वितरक करणारे 11 वितरक आहेत. पैकी कळंबोली पाच, तळोजा व पनवेल प्रत्येकी तीन हे वितरक या ठिकाणच्या उद्योगांची गरज भागवू शकत नाहीत. त्यामुळे तुर्भे दोन, जासई एक, उल्हासनगर तीन, मुंबई दोन असे आठ पुरवठादार ही गरज पूर्ण करत होते. परंतु शासनाने औद्योगिक ऑक्सिजनचा पुरवठा 100 टक्के बंद केल्यामुळे हे व्यवसाय ठप्प पडले आहेत. त्यामुळे या व्यवसायामध्ये काम करणारे शेकडो कामगार बेरोजगार झाले आहेत.

वाढत्या कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर शासनाने औद्योगिक क्षेत्रासाठी ऑक्सिजन वितरित न करण्याचे परिपत्रक काढल्यामुळे, ऑक्सिजन पुरवठादार कंपन्यांनी सिलिंडरचा पुरवठा बंद केला आहे. त्यामुळे कटर आणि फॅब्रिकेटर व्यवसाय ठप्प झाला आहे. या उद्योगातील उद्योजक सिलिंडर पुरवठासंबंधी मागणी करीत आहेत, परंतु सिलिंडरचा पुरवठा होत नसल्यामुळे वितरण बंद आहे. अनेक कामगार बेरोजगार झाले आहेत.

-परेश दवे, औद्योगिक गॅस वितरक, कळंबोली

Check Also

कामोठ्यातील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे पदाधिकारी भाजपमध्ये

पनवेल : रामप्रहर वृत्त विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे कामोठे शहर अध्यक्ष किशोर मुंडे, …

Leave a Reply