उरण : वार्ताहर
आमदार महेश बालदी व नगराध्यक्ष सायली म्हात्रे यांच्या प्रयत्नाने शनिवार (दि. 24)पासून उरण नगर परिषदेच्या महाराष्ट्रभूषण डॉ. नारायण विष्णू धर्माधिकारी शाळा क्र. 1 व 2, पेन्शनर पार्क या ठिकाणी कोविड लसीकरण केंद्र सुरू होणार आहे. इंदिरा गांधी ग्रामीण रुग्णालय येथे लसीकरण सुरू होते. या ठिकाणी ओपीडी, अॅण्टीजन टेस्ट सुरू असल्याने लसीकरणासाठी आलेल्या नागरिकांना त्रास होत असे. त्यामुळे आमदार महेश बालदी यांनी जिल्हाधिकारी यांची परवानगी घेऊन उरण येथील उरण नगर परिषदेच्या शाळेत लसीकरण केंद्र सुरू करवून घेतले. या केंद्रामध्ये पाणी पिण्याची सोय, बसण्याची सोय करण्यात आली असून त्या अनुषंगाने ठिकाणाची पाहणी करण्यात आली.या वेळी नगराध्यक्ष सायली म्हात्रे, भाजप तालुका अध्यक्ष तथा नगरसेवक रवी भोईर, शहर अध्यक्ष तथा नगरसेवक कौशिक शाह, राजेश ठाकूर, मेराज शेख, शहर युवा अध्यक्ष निलेश पाटील, हस्तीमल मेहता, तालुका उपाध्यक्ष प्रकाश ठाकूर, सुरज ठवले, विनायक कोळी, सागर मोहिते, वरिष्ठ आधी परिचारिका सारीका शेनेकर, परिचारिका निवेदिता कोटकर, आरोग्य सेविका विलासिनी बोर्वेकर, दिपीका मालगावकर आदी उपस्थित होते.