Breaking News

कोरोना मृतांच्या आकडेवारीची ठाकरे सरकारकडून लपवाछपवी

भाजप नेते किरीट सोमय्या यांचा आरोप

मुंबई ः प्रतिनिधी
ठाकरे सरकारकडून कोरोना रुग्णांच्या मृत्यूच्या आकडेवारीची लपवाछपवी केली जात असल्याचा गंभीर आरोप भाजप नेते माजी खासदार किरीट सोमय्या यांनी केला आहे. सोमय्या यांनी ठाणे आणि वसईमधील आकडेवारी सादर करीत सरकारच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
किरीट सोमय्या यांनी एक व्हिडिओ ट्विटरवर पोस्ट केला आहे. यामध्ये ते म्हणतात की, 1 ते 13 एप्रिल काळात वसई-विरार शहरात 201 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. महापालिकेने मात्र 23 मृत्यू दाखवले आहेत. आयुक्त म्हणतात खासगी रुग्णालयातील मृत्यू आम्ही धरले नव्हते, सुधार करू.
सोमय्या यांनी पुढे सांगितले की, ठाण्यात स्मशानभूमींमध्ये 309 जणांवर अंत्यसंस्कार झाल्याची नोंद आहे, मात्र ठाणे महापालिका क्षेत्रात 57 कोरोना मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे.

Check Also

पनवेलमध्ये महारोजगार मेळाव्यास उत्स्फूर्त प्रतिसाद

६४ कंपन्यांचा सहभाग; २५०२ उमेदवारांची उपस्थिती पनवेल : रामप्रहर वृत्तरोजगाराच्या शोधात असलेल्या युवक-युवतींना थेट रोजगाराच्या …

Leave a Reply