Breaking News

दारू समजून सॅनिटायझर प्यायल्याने सात जणांचा मृत्यू

यवतमाळ ः प्रतिनिधी
दारूचे व्यसन जडलेल्या काहींना दारू समजून सॅनिटायझर प्यायल्याने आपला जीव गमवावा लागल्याचा धक्कादायक प्रकार यवतमाळ जिल्ह्यातील वणी येथे घडला आहे.
यात एकूण सात जणांचा मृत्यू झाला आहे. सात जणांपैकी तिघांचा घरी, तर अन्य व्यक्तींचा रुग्णालयात मृत्यू झाला आहे. लॉकडाऊनमुळे दारूची दुकाने बंद असल्याने राहवले न गेल्याने काही जणांनी दारू समजून सॅनिटायझर प्यायल्याची माहिती मृतांच्या नातेवाइकांनी दिली आहे.
दरम्यान, या दुर्घटनेतील मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
दत्ता लांजेवार, विजय बावणे, नूतन पाथरटकर, संतोष मेहरे, सुनील ढेंगळे, गणेश शेलार आणि भारत रुईकर अशी मृत व्यक्तींची नावे आहेत. या सर्वांनी सॅनिटायझर घेतल्यानंतर त्यांची तब्येत बिघडली. त्यानंतर त्यांना वणी येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

Check Also

सौ. शकुंतला रामशेठ ठाकूर यांना यमुना स्त्री सन्मान पुरस्कार प्रदान

सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातील भरीव योगदानाचा गौरव पनवेल ः रामप्रहर वृत्तइतिहासात तसेच आजच्या आधुनिक युगातही अनेक …

Leave a Reply