Breaking News

कर्जतमध्ये महावीर जयंती साधेपणात

कोरोनामुळे मिरवणूकही रद्द

कर्जत : प्रतिनिधी

कोरोनाच्या पार्श्वभूमिवर कर्जतमध्ये रविवारी (दि. 25) श्री महावीर जयंती केवळ महावीरांच्या मूर्तीचे पूजन  करून अत्यंत साधेपणाने साजरी करण्यात आली. दरवर्षी काढण्यात येणारी भगवान महावीरांच्या मूर्तीची मिरवणूक यंदा रद्द करण्यात आली. गेल्या वर्षीही महावीर जयंती साधेपणानेच साजरी करण्यात आली होती.

श्री महावीर जयंती म्हणजे जैन धर्मियांचा एकप्रकारे सणच असतो. या दिवशी सकाळपासूनच जैन मंदिरात गर्दी होत असते. विविध धार्मिक कार्यक्रमांनंतर कर्जत शहरातून चांदीच्या रथातून भगवान महावीरांच्या मूर्तीची  मिरवणूक काढण्यात येत. त्यामध्ये कर्जत शहरातील शंभर टक्के जैन बांधव व भगिनी आपल्या मुलाबाळांसह सहभागी होत असतात. मात्र गतवर्षा प्रमाणे यंदाही कोरोनाचे संकट असल्याने आणि ही दुसरी लाट भयानक असल्याने कर्जतमधील जैन मंदिरात निवडक मान्यवरांच्या उपस्थितीत फक्त मूर्तीपूजन करण्यात आले, मिरवणूक रद्द करण्यात आली.

मी लहानपणापासून श्री महावीर जयंतीला मिरवणुकीत सहभागी असतो. गेल्या वर्षी व यंदाही कोरोना महामारीचे संकट आल्याने मिरवणूक रद्द करण्यात आली होती.

-दिनेश प्रेमचंद जैन, उपाध्यक्ष, जैन श्वेतांबर संघ, कर्जत

Check Also

रायगड तायक्वांडो असोसिएशनतर्फे बेल्ट परीक्षा उत्तीर्ण, आंतरराष्ट्रीय खेळाडूंचा गौरव

आमदार प्रशांत ठाकूर यांचा विशेष सत्कार पनवेल : रामप्रहर वृत्तरायगड तायक्वांडो असोसिएशनच्या वतीने बेल्ट परीक्षेत …

Leave a Reply