Breaking News

कडावमध्ये सांडपाणी रस्त्यावर; सततच्या दुर्गंधीने प्रवासी हैराण

कडाव : प्रतिनिधी

कर्जत-मुरबाड राज्यमार्गावरील कडावमधून  पोटलपालीकडे जाणार्‍या रस्त्यावर गेल्या अनेक दिवसांपासून सांडपाणी वाहत आहे. त्यामुळे या परिसरात दुर्गंधी पसरली असून, ग्रामस्थांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. कडावमधील शिवतेज हॉटेलजवळ पोटलपाली, जांभिवलीकडे जाणारा रस्ता आहे. या परिसरात अनेक छोटीमोठी दुकाने आणि एक रिक्षा स्टँड आहे. त्यामुळे हा परिसर नेहमीच गजबजलेला असतो. या ठिकाणी असलेल्या रस्त्यावरून गेल्या काही दिवसांपासून सांडपाणी वाहत आहे. त्यामुळे या परिसरात भरून राहिलेल्या दुर्गंधीचा येथील व्यावसायिक, ग्रामस्थ आणि प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. या दुर्गंधीने भविष्यात आरोग्याचा गंभीर प्रश्न उभा राहू शकतो, असे बोलले जात आहे, तसेच सांडपाण्यामुळे निसरड्या झालेल्या रस्त्यावरून मागील महिनाभरात सात ते आठ दुचाकी घसरल्याच्या घटना घडल्या आहेत. या अपघातात जखमी झालेल्या दुचाकीस्वारांना  आर्थिक फटका सहन करावा लागत आहे.

Check Also

खोपोलीत 106 कोटींचे ड्रग्ज जप्त

पोलिसांची कंपनीत कारवाई, त्रिकूट ताब्यात खोपोली, खालापूर : प्रतिनिधी खोपोली पोलिसांनी ढेकू गावच्या हद्दीतील एका …

Leave a Reply