Breaking News

उरणमधील विद्यार्थ्यांचे ऑनलाईन निबंध, चित्रकला, वक्तृत्व व रांगोळी स्पर्धेतील सुयश

उरण : प्रतिनिधी

सुयश क्लासेस आवरे व निगा फाऊंडेशनच्या संयुक्त विद्यमाने दीपावलीनिमित्त घेण्यात आलेल्या ऑनलाईन निबंध, चित्रकला, रांगोळी व वक्तृत्व स्पर्धेत समीर म्हात्रे-निबंध, कृतुजा गावंड-रांगोळी, पार्थिव पाटील-चित्रकला, उपासना गावंड-वक्तृत्व यांनी ऑनलाईन स्पर्धेत सुयश मिळविले असून, ही स्पर्धा ग्रामीण भागातील, तसेच शहरी भागातील स्पर्धकांचे प्रोत्साहन वाढविण्यासाठी घेण्यात आली होती.

या ऑनलाईन स्पर्धेत बहुसंख्य स्पर्धकांनी भाग घेतला होता. निबंध स्पर्धेचा निकाल समीर म्हात्रे प्रथम, सायली गावंड द्वितीय, प्रियांशी म्हात्रे तृतीय; वक्तृत्व स्पर्धा उपासना गावंड प्रथम, वेदांत गावंड द्वितीय, सारा गावंड तृतीय; तर चित्रकला स्पर्धा पार्थिव पाटील प्रथम, मिहीर म्हात्रे द्वितीय, अंकुर गावंड तृतीय; रांगोळी स्पर्धा ऋतुजा गावंड प्रथम, साक्षी गावंड द्वितीय, दिव्या गावंड तृतीय या स्पर्धकांनी संपूर्ण ऑनलाईन स्पर्धेत बाजी मारली. विजयी स्पर्धकांना पारितोषिक देऊन गौरविण्यात आले.

Check Also

विद्यार्थ्यांनी स्पर्धेच्या युगात विविध क्षेत्रांचा अनुभव घ्यावा -लोकनेते रामशेठ ठाकूर

उरण : रामप्रहर वृत्तकर्मवीर अण्णांनी दिलेला शिक्षण आणि संस्कारांचा आदर्श आपल्याला पुढे घेऊन जाणे अत्यंत …

Leave a Reply