Breaking News

कोरोना नियमांचे करंजाडेत उल्लंघन

पनवेल : वार्ताहर

पनवेल तालुक्यासह करंजाडे वसाहतीत हद्दीत कोरोनाचे रुग्ण वाढत असतानादेखील नियमांचे उल्लंघन सर्रास केले जात असल्याचे दिसून येत आहे. कोरोनाबाधितांबरोबरच मृत्यूचे प्रमाणदेखील वाढत चालले आहे. करंजाडे वसाहतीमध्ये गेल्या वर्षभरात एकूण 32 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. नागरिक बिनधास्त रस्त्यावर फिरताना दिसत आहे. यामुळे आता तरी नागरिकांनो सुधारा, असे आवाहन सिडकोच्या आरोग्य विभागातील डॉक्टरांनी केला आहे. राज्यासह महाराष्ट्रामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत चालला आहे. कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी शासन स्तरावर विविध उपाययोजना राबविल्या जात आहे. यामध्ये पोलीस प्रशासनाकडून कडक पावले उचलली आहेत, तसेच सोशल डिस्टन्सिंग पाळा, मास्क वापरा, गर्दीच्या ठिकाणी जाऊ नये, सॅनिटायझरचा वापर करा अशा सूचना नागरिकांना दिलेल्या आहेत, मात्र अनेक नागरिक दिलेल्या सूचनांकडे पूर्णपणे दुर्लक्ष करीत असल्याचे दिसून येत आहे. गेल्या वर्षीपेक्षा यावर्षी कोरोनाची लाट मोठी असल्याचे तज्ञाचे म्हणणे आहे. सिडकोद्वारे नव्याने विकसित केलेली करंजाडे वसाहतीमध्ये एक लाख लोकसंख्या असलेल्या या वसाहतीमध्येदेखील बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे, मात्र कोरोनाचा वाढत असलेला प्रादुर्भाव रोखण्यासाठी पनवेल तहसीलदार विजय तळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली पथक तसेच पनवेल शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक अजयकुमार लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक अमोल कोरडे, उपनिरीक्षक लाला लोणकर यांच्यासह पोलीस पथक, ग्रामविकास अधिकारी प्रेमसिंग गिरासे, वडघर ग्रा. वि. अधिकारी डी. यू. देवरे, पोलीस पाटील कुणाल लोंढे, ग्रामीण आरोग्य पथक, सिडकोचे आरोग्य पथक असे सर्व मिळून करंजाडे वसाहतीमध्ये गेल्या वर्षभरात यांच्याकडून विविध उपाययोजना करण्यात येत आहे. यामध्ये मास्क न घालणार्‍यांवर, उशिरापर्यंत दुकाने उघडी ठेवणार्‍यांवर, विनाकारण रस्त्यावर फिरणार्‍यांवर कारवाया करण्यात येत आहेत, मात्र हम नही सुधरेंगे, मला कोरोना होणार नाही. अशा पद्दतीने वागणार्‍या नागरिकांमुळे कोरोनाबाधितांचे प्रमाण वाढले आहे. करंजाडे वसाहतीमधील सेक्टर 1 ते 6, तसेच आर-1 ते आर- 5 येथील सिडको आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार गेल्या वर्षभरामध्ये 1495 पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. यामध्ये 1257 जणांना बरे झाल्यानंतर घरी सोडण्यात आले. तसेच 184 जण कोरोनावर उपचार घेत आहेत. त्याचबरोबर एकूण 32 जणांचा मृत्यू झाल्याची नोंद सिडको आरोग्य विभागाकडे नोंदविण्यात आली आहे. 27 एप्रिल रोजी एका दिवसात एकूण 22 जण कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. कोरोना रुग्ण बाधित होत चालले असल्याने नागरिकांनी दक्षता घेणे गरजेचे असल्याचे मत सिडकोच्या डॉक्टरांनी व्यक्त केले आहे.

Check Also

लोकसभेचा ‘मत’संग्राम

जगातील सर्वांत मोठी लोकशाही असलेल्या भारतात लोकसभेची निवडणूक होत आहे. हा सामना भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही …

Leave a Reply