Breaking News

अभिषेक वर्माचा ‘सुवर्ण’वेध; नेमबाजी विश्वचषक स्पर्धेत सौरभलाही कांस्यपदक

रिओ दी जनेरो : वृत्तसंस्था

ब्राझीलच्या रिओ दी जनेरो शहरात सुरू असलेल्या नेमबाजी विश्वचषक स्पर्धेत भारतीय नेमबाजांनी चांगली कामगिरी केली आहे. पुरुषांच्या 10 मी. एअर पिस्तुल प्रकारात भारताच्या अभिषेक वर्माने सुवर्ण, तर सौरभ चौधरीने कांस्यपदक पटकाविले. अंतिम फेरीत अभिषेक वर्माने 244.2, तर सौरभ चौधरीने 221.9 गुणांची कमाई केली. तुर्कीच्या इस्माईल केलेसने 243.1 गुणांसह रौप्यपदक मिळविले.10 मी. एअर पिस्तुल प्रकारात अभिषेक आणि सौरभ या दोन्ही भारतीय खेळाडूंनी आपला ऑलिम्पिक प्रवेश या आधीच निश्चित केला आहे. याव्यतिरिक्त 50 मी. रायफल थ्री पोजिशन प्रकारात भारताच्या संजीव राजपूतने रौप्यपदकाची कमाई करीत ऑलिम्पिक कोटा मिळवला आहे.

Check Also

महात्मा फुले जनआरोग्य योजनेत आमूलाग्र बदलांचे संकेत

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या पाठपुराव्याला मोठे यश! संपूर्ण महाराष्ट्रातील रुग्णांना होणार फायदा मुंबई : रामप्रहर …

Leave a Reply