Breaking News

तेलाच्या अपहारप्रकरणी दोघे अटकेत; माल जप्त

पनवेल : वार्ताहर

तेलाची लाखो रुपयांची ऑर्डर देवून त्यानंतर तेल ताब्यात घेऊन ऑर्डरच्या बिलाचे पैसे न देता पळ काढणार्‍या टोळीपैकी दोघांना तुर्भे पोलिसांनी गजाआड केले आहे. त्यांच्या अटकेमुळे अशा प्रकारचे फसवणुकीचे अनेक गुन्हे उघडकीस येणार आहेत.

आरोपी मुकेश पटेल (33 रा. कामोठे) व त्याचा सहकारी यांनी फिर्यादीला चार लाख रुपये किमतीच्या सफोला ऑईल व पॅराशुट ऑइलची ऑर्डर देवून त्यास फेक पोर्टलद्वारे पेमेंट पाठवून हा माल पनवेल तालुक्यातील कॉलेज रोडच्या हद्दीत भाड्याने घेतलेल्या गोडावूनमध्ये ठेवला व तेथून सकाळी दुसरीकडे हलविला. दरम्यान, फिर्यादीस पेमेंटची फसवणूक झाल्यामुळे त्याने गोडावूनमध्ये भेट दिली असता गोडावून पूर्ण रिकामे दिसले.

याबाबतची तक्रार त्यांनी तुर्भे पोलीस ठाण्यात करताच वरिष्ठ निरीक्षक राजेंद्र आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक शिवूरकर व गुन्हे अन्वेषण पथक यांनी सलग तीन दिवस सीसीटीव्ही फुटेज चेक करून व गुप्त बातमीदाराद्वारे या गुन्ह्यात वापरलेले वाहन 407 हा टेम्पो शोधून काढला व त्या टेम्पोच्या मुळ मालकापर्यंत पोहचले. व त्याने दिलेल्या माहितीनुसार मुकेश पटेल याला अटक करून त्याच्याकडून तीन लाख 78 हजारांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. फरार आरोपीचा शोध तुर्भे पोलीस करीत आहेत.

Check Also

तापमानवाढीमुळे महायुतीच्या कार्यकर्त्यांनी प्रचारादरम्यान काळजी घ्यावी -खासदार श्रीरंग बारणे

कर्जत : प्रतिनिधी मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी, मनसे, आरपीआय, रासप व मित्रपक्ष महायुतीचे …

Leave a Reply