10 दिवसांत 5,292 रुग्ण झाले बरे
पनवेल : वार्ताहर
पनवेल महानगरपालिका क्षेत्रात दररोज कोरोनाबाधित रुग्ण हे पाचशेचा आकडा पार करत आहे. ही परिस्थिती भयावह असली तरी पालिका क्षेत्रातील रुग्ण बरे होणार्यांची संख्यादेखील दिवसाला पाचशेच्या घरात पोहचली आहे. त्यामुळे गेल्या 10 दिवसांत पाच हजार 292 रुग्ण उपचारानंतर बरे होऊन घरी परतले आहे. बरे होणार्यांमध्ये वयोवृद्धांचा समावेश मोठ्या प्रमाणात आहे. आकडे जरी वाढत असलेले तरी रुग्ण बरे होणार्यांचे प्रमाण अधिक असल्याने अनेकांनी समाधान व्यक्त केले आहे.
पनवेल महानगरपालिका क्षेत्रात फेब्रुवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून कोरोनाच्या दुसर्या लाटेला खर्या अर्थाने सुरुवात झाली. या पूर्वी जानेवारी आणि फेब्रुवारीमध्ये दिवसाला 20 ते 30 रुग्ण आढळून आले होते, मात्र शेवटच्या आठवड्यात या रुग्ण वाढीच्या संख्येने वेग घेतला आणि आणि दिवसाला 70 हुन अधिक नवीन रुग्ण आढळून येऊ लागले अगदी मार्च महिन्याच्या पहिला आठवड्यात या रुग्णसंख्येने शंभरी पार केली आणि बघता एप्रिल महिन्यात हाच आकडा 300च्या घरात पोहचला. त्या नंतर या रुग्णसंख्येने 500चा आकडा ओलांडत धोक्याची घंटा बजवण्यास सुरुवात केली.
हा आकडा कमी करण्यासाठी पालिका प्रशासनानेयुद्ध पातळीवर प्रयत्न सुरू केले. इमारती सील करणे, विनामास्क फिरणार्यांवर दंडात्मक कारवाई करणे, हॉस्पिटलमध्ये उपचार मिळावे या साठी आरक्षित खाटा उपलब्ध करून देणे. त्यासोबत मोफत उपचारासाठी इंडिया बुल्ससारखे क्वारंटाइन सेंटर उभा करून सौम्य लक्षणे असलेल्याने या ठिकाणी उपचार सुरू केले. 30 हुन
अधिक खासगी रुग्णालयात माफक दरात उपचार सेवा सुरू करण्यात यश आले.
हे करत असताना रुग्णसंख्या सौम्य गतीने वाढतच होती. आज तागायत पालिका क्षेत्रात चार हजार 740 रुग्ण हे पालिका क्षेत्रातील खाजगी रुग्णालय आणि होम आयसोलेशनमध्ये उपचार घेत आहे. हा आकडा जरी भयावह असला तरी रुग्णवाढी सोबत रुग्ण बरे होणाचे प्रमाण एप्रिल महिन्यापासून सुरू झाले. मे महिन्यात बरे होण्याचे प्रमाणदेखील वाढत चालले आहे. आता रुग्ण बरे होणार्या संख्येने जवळपास पाचशेचा आकडा पार केला आहे. एप्रिल महिन्यातील 18 एप्रिल ते 27 एप्रिल पर्यंत पाख् हजार 292 रूग्ण हे उपचारा नंतर बरे होऊन घरी परतले आहे. या कालावधीत रुग्णांना साधे बेडदेखील मिळणे मुश्किल झाले होते. ऑक्सिजन आणि व्हेंटिलेटर मिळवण्यासाठी रुग्णांना पळापळ करावी लागत होती. त्यात रुग्ण बरे होण्याच्या संख्येत वाढ झाल्याने, पनवेलकरांना दिलासा मिळाला आहे.
लसीकरण केंद्र उभारण्याची मागणी
पनवेल नवीन पनवेल, कामोठे, कळंबोली आणि खारघर तसेच तळोजामधील रुग्णसंख्या बरी होणार्यांची संख्या ही अधिक आहे. हे पालिका प्रशासनाला आलेले यश आहे. उपचारासोबत पालिका क्षेत्रात लसीकरण जोमाने सुरू असल्याने बधितांचा आकडा कमी होऊ लागला आहे. त्यामुळे पालिका क्षेत्रातील तक्का, पोदी, काळुंद्रे व भिंगारी येथे लसीकरण केंद्र उभारण्याची मागणी नुकतीच महापालिका सभागृह नेते परेश ठाकूर यांनी आयुक्तांकडे केली आहे.