पनवेल : रामप्रहर वृत्त
दानशूर व्यक्तिमत्व माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अमृत महोत्सवी वाढदिवस वर्षानिमित्ताने आयोजित प्रौढ महिला आणि पुरुष गट जिल्हा अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ रविवारी (दि. 22) सायंकाळी 6 वाजता पनवेलचे महापौर नितीन पाटील यांच्या हस्ते होणार आहे.
श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ पनवेल आणि रायगड जिल्हा कबड्डी असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने उलवे नोडमध्ये ही जिल्हास्तरीय स्पर्धा खेळली जात आहे. स्पर्धेच्या पारितोषिक वितरण समारंभाचे अध्यक्ष म्हणून पनवेल महापालिकेचे माजी विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे आणि महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनचे माजी सरकार्यवाह अॅड. आस्वाद पाटील, तर प्रमुख उपस्थिती अर्जुन पुरस्कार विजेत्या शकुंतला खटावकर व अभिलाषा म्हात्रे यांची असणार आहे.
उलवे नोड सेक्टर 12मधील रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलजवळील रामशेठ ठाकूर मैदानावर होत असलेल्या या स्पर्धेत जिल्ह्यातील 188 पुरुष कबड्डी संघ आणि 32 महिला संघ सहभागी झाले आहेत. स्पर्धेत खेळाडूंकडून चमकदार कामगिरी पहायला मिळत आहे.
स्पर्धेचा रविवारी अंतिम दिवस असून त्याच दिवशी सायंकाळी पारितोषिक वितरण समारंभ होणार आहे. या स्पर्धेचा कबड्डी रसिकांनी आनंद घ्यावा, असे आवाहन श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाचे अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, रायगड जिल्हा राज्य कबड्डी असोसिएशनच्या कार्यवाह चित्राताई पाटील, मंडळाचे सचिव परेश ठाकूर, उपाध्यक्ष अरुणशेठ भगत, स्पर्धा संयोजन समितीचे सचिव शरद कदम यांनी केले आहे.
Check Also
पनवेलच्या झोपडपट्टी पुनर्वसनासाठी आमदार प्रशांत ठाकूर यांचा पाठपुरावा
मंत्रालयात महत्त्वपूर्ण बैठक पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल महानगरपालिका क्षेत्रातील झोपडपट्टीवासीयांच्या पुनर्वसनाचा आणि त्यांच्या निवाऱ्याचा प्रश्न …
RamPrahar – The Panvel Daily Paper