Breaking News

महाराष्ट्रातील मंत्रीमंडळ वाचाळवीरांचे

आमदार आशिष शेलारांचा आघाडी सरकारला टोला

मुंबई : प्रतिनिधी

लस मिळत नाही म्हणून ओरडायचे आणि दुसरीकडे आम्ही लसीकरणामध्ये नंबर एक आहोत असे आहोत हेही ओरडायचे. त्यामुळे लस नाही हे ओरडे आपले अपयश झाकण्यासाठी सुरु आहे. महाराष्ट्रातील मंत्रीमंडळ वाचाळवीरांचे आहे, असा सनसनाटी टोला भाजप नेते आमदार अ‍ॅड. आशिष शेलार यांनी महाविकास आघाडी सरकारला लगावला आहे.

पश्चिम बंगालच्या निकालावरून कालपासून भाजपला लक्ष करणार्‍या सर्व पक्ष आणि नेत्यांना चोख प्रतिउत्तर सोमवारी भाजप नेते आमदार अ‍ॅड. आशिष शेलार यांनी प्रदेश कार्यालयात पत्रकारांशी बोलताना दिले.

या वेळी ते म्हणाले की, जे स्वतः कुबड्यांवर आहेत. ज्यांचे पाहिले पाऊल कुबड्यांशिवाय पडत नाही. त्यांची बेळगाव आणि पश्चिम बंगालवर बोलण्याची औकातच नाही. भाजपला पश्चिम बंगालमध्ये अपेक्षित यश मिळाले नाही. आम्ही त्यांना पराभूत करू शकलो नाही हे खरे आहे. आम्हला पूर्ण विजय मिळाला नाही, पण यशाचे मोजमाप फक्त भाजपकडेच आहे. मंत्री जितेंद्र आव्हाड जर अदृश्य शक्तीबद्दल बोलले असतील तर त्यांची काळजी काँग्रेसने करावी. या अदृश्य हातांनी काँग्रेस भूईसपाट झाली.

पंढरपूरात मग काय झाले? यालाच स्वत:चे ठेवायचे झाकून आणि दुसर्‍याकडे बघायचे वाकून असा हा प्रकार आहे. असा टोला शेलारांनी लगावला. अर्धवट माहितीच्या आधारावर पत्रकार परिषद घेणे म्हणजे नवाब मलिक. मोफत लस प्रकरणात ते तोंडावर आपटले आहेत. खोटी माहिती त्यांनी देऊ नये. तेच नवाब मलिक गृहमंत्री अमित शाह यांनी राजिनामा द्या, असे बोलत आहेत. मग पंढरपूरमध्ये त्यांच्या पक्षाला अपयश मिळाले म्हणून नवाब मलिक उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा राजीनामा मागणार का? असा सवाल आमदार शेलार यांनी केला.

नाना पटोलेंचे आयुष्य कालाकांडीच्या कामात गेले. नाना पटोले व्यवहाराच्या सत्यतेवर माहिती ठेवत नाही. उचलली जीभ, लावली टाळ्याला असा त्यांचा स्वभाव आहे. त्यामुळे कोणीही त्यांना गांभीर्याने घेत नाही. माहितीविना बोलणं म्हणजे कालाकांडी, नाना पटोलेंची पत्रकार परीषद, अशी टीका शेलार यांनी केली.

‘…तर भाजपसमोर निभावही लागणार नाही’

मुंबई : प्रतिनिधी

पश्चिम बंगालसह पाच राज्यातील विधानसभा निवडणुकीचे निकाल रविवारी जाहीर झाले. यात पश्चिम बंगालमधील निकालाची सध्या देशभरात चर्चा सुरू आहे. महाराष्ट्रातही निकालावरून सत्ताधारी पक्ष करीत असेल्या टीकेला भाजपने आव्हान दिले आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी वेगवेगळे लढले, तर भाजपसमोर तुमचा निभावही लागणार नाही, असा टोला व आव्हान महाविकास आघाडीला दिले आहे.

पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक निकाल आणि पंढरपूर मंगळवेढा पोटनिवडणूक निकलाच्या अनुषंगाने चंद्रकांत पाटील यांनी महाविकास आघाडीतील काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेला थेट आव्हान दिले आहे. पाटील यांनी एक ट्विट केलं आहे. महाराष्ट्रात माझे आव्हान आहे, कोणत्याही निवडणुकीत चारही पक्षांनी वेगवेगळे लढून पाहावे, मग सर्वांना कल्पना येईल की कोणाला किती बोलण्याची पात्रता आहे. तीनही पक्ष एकत्रित असून, सुद्धा पंढरपुरात आमचा पराभव करू शकले नाहीत, मग हे वेगवेगळे लढले, तर भाजपासमोर यांचा निभावही लागणार नाही, असे म्हणत चंद्रकांत पाटील यांनी महाविकास आघाडीला प्रत्युत्तर दिले आहे.

Check Also

लोकसभेचा ‘मत’संग्राम

जगातील सर्वांत मोठी लोकशाही असलेल्या भारतात लोकसभेची निवडणूक होत आहे. हा सामना भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही …

Leave a Reply