Breaking News

‘परमशांतीधाम’मधील रुग्ण झाले कोरोनामुक्त

पनवेल : प्रतिनिधी

तळोजा येथील परमशांतीधाम वृद्धाश्रमातील कोरोनाबाधित पनवेल महानगरपालिकेने केलेल्या अथक प्रयत्नांनी कोरोनामुक्त झाले आहेत. पनवेल महापालिका गेले 14 दिवस बाधित रुग्णांना वैद्यकीय सेवा देत होती. अखेर येथील बाधित रुग्ण पूर्णतः बरे झाले असून येथील स्वामीजींनी महापालिकेचे आभार मानले आहेत.

तळोजा एमआयडीसीमधील परमशांतीधाम वृद्धाश्रमातील वृद्ध 17 एप्रिल रोजी बाधित झाल्याची माहिती कळताच महापालिकेने आपले वैद्यकीय पथक त्या ठिकाणी पाठविले होते. सगळ्यांची चाचणी केल्यानंतर 68 वृद्धांपैकी 66 जणांना कोरोनाची लागण झाल्याचे लक्षात आले. त्यातील 16 जणांची प्रकृती अत्यंत चिंताजनक होती. पालिकेने त्यांना तत्काळ एमजीएम रुग्णालयात बेड उपलब्ध करून दिले होते. 

वृद्धाश्रमातील बहुतांश वृद्धांना जवळचे नातेवाईक नसल्याने पालिकेने या वृद्धांची पुढील जबाबदारी घेतली. पालिकेची खारघर आणि कळंबोली येथील नागरी प्राथमिक आरोग्य केंद्राची वैद्यकीय टीम 14 दिवस सकाळ-संध्याकाळ दोन वेळा वृद्धाश्रमात जाऊन त्यांची तपासणी करून उपचार करीत होती. त्यांना लागणार्‍या औषधांचा पुरवठाही पालिकेच्या वैद्यकीय विभागाच्या वतीने करण्यात येत होता.

कोरोनाच्या पहिल्या लाटेत वृद्धाश्रमाने खबरदारी घेत कोरोनाचा संसर्ग होणार नाही याची काळजी घेतली होती, मात्र दुसर्‍या लाटेत वृद्धाश्रमात वेगाने कोरोनाचा शिरकाव झाला. पालिकेने केलेल्या उपचारामुळे वृद्धाश्रमातील बाधितांना मोठा दिलासा मिळाला.

अवघ्या काही दिवसांत पालिकेच्या अथक प्रयत्नाने बाधितांनी कोरोनावर मात करून रुग्ण ठणठणीत बरे झाले आहेत. पालिकेने दिलेल्या सहकार्याबद्दल येथील व्यवस्थापन पाहणार्‍या स्वामीजींनी पालिकेचे आभार मानले आहेत.

Check Also

25 एकांकिका राज्यस्तरीय अटल करंडक स्पर्धेच्या अंतिम फेरीत दाखल

पनवेल : रामप्रहर वृत्तश्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ पुरस्कृत आणि अखिल भारतीय मराठी नाट्य …

Leave a Reply