Breaking News

पनवेलमधील दुर्बल घटकांना आर्थिक दिलासा

पनवेल : वार्ताहर

पनवेल तालुक्यातील कोरोनाच्या कठीण काळात गरीब, वृद्ध, विधवा लाभार्थ्यांनी शासनाचा आर्थिक मदतीचा लाभ घेतला आहे. यामध्ये संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ निवृत्तिवेतन योजना व इंदिरा गांधी योजनेचा लाभार्थ्यांच्या बँक खात्यावर एप्रिल व मे 2021 अशा दोन महिन्यांचे एकाचवेळी अनुदान पनवेल तहसील कार्यालयाकडून जमा करण्यात आले आहे. निराधार नागरिकांना आधार म्हणून शासनाकडून निराधारांसाठी विविध कल्याणकारी योजना राबविल्या जातात. यात संजय गांधी निराधार अनुदान योजना, श्रावणबाळ योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्तीवेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती वेतन योजना आदींचा समावेश आहे. स्वतःचा उदरनिर्वाह करण्यास असमर्थ असणार्‍या निराधार व्यक्तींना या योजनेंतर्गत आर्थिक साहाय्य देण्यात येते. 65 वर्षांहून अधिक वय असणारे वृद्ध, निराधार पुरूष, दहा वर्षापेक्षा कमी वयाची मुले असणार्‍या निराधार व आर्थिकदृष्टया असमर्थ, विधवा स्त्री, दुर्धर आजाराने ग्रस्त असलेले लाभार्थी आदींना या योजनेचा लाभ मिळतो. पनवेल तालुक्यात अशा योजनेतील एकूण 4693 लाभार्थी असून मानधनाची रक्कम बँक ही त्यांच्या खात्यात जमा होते. यांना एप्रिल व मे या दोन महिन्यांचे आर्थिक साहाय्य देणे बाकी होते, त्यानुसार आर्थिक व दुर्बल घटकांना दिलासा देण्याच्या दृष्टीने लाभार्थींना एप्रिल व मे 2021 या दोन महिन्यांचे अर्थसाहाय्य एकाचवेळी पात्र लाभार्थ्यांना देण्याबाबत जिल्हाधिकार्‍यांकडून 26 एप्रिल 2021 रोजी आदेश प्राप्त झाले. त्या आदेशानुसार पनवेल तहसीलदार कार्यालयाकडून तहसीलदार विजय तळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली पनवेल तालुक्यातील या योजनेतील लाभार्थीना एप्रिल महिन्यात यांच्या वैयक्तिक बँक खात्यावर रक्कम जमा करण्यात आली आहे. त्यामुळे दुर्बल घटकांना लॉकडाऊन काळात दिलासा मिळाला आहे.

तालुक्यातील पात्र लाभार्थी (योजना)

अनुदान                                   लाभार्थी   वाटप केलेले

संजय गांधी निराधार योजना                 1796      38,60,400 रुपये

श्रावणबाळ सेवा वृद्धपकाळ निवृत्ती वेतन योजना   1998      36,22,400 रुपये

इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्तीवेतन      828       37,4,400 रुपये

इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती वेतन        71        42,600 रुपये

                            एकूण लाभार्थी    4693

एकूण वाटप केलेले अनुदान         78,99,800 रुपये

संजय गांधी निराधार अनुदान योजना, श्रावणबाळ योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्तीवेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती वेतन योजना या योजनांतील लाभार्थींना कोरोना या महामारीमध्ये थोडा दिलासा देण्यात आला आहे. योजनांच्या पात्र लाभार्थींना एप्रिल व मे या दोन महिन्यांचे अर्थसहाय्य्य त्यांच्या वैयक्तिक बँक खात्यात जमा करण्यात आले आहे.

-विजय तळेकर, तहसीलदार पनवेल

Check Also

खारघरमध्ये महिलांसाठी क्रिकेट; स्पर्धा आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते उद्घाटन

खारघर : रामप्रहर वृत्तखारघरमध्ये जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून महिलांसाठी आयोजित करण्यात आलेल्या क्रिकेट स्पर्धेचे …

Leave a Reply