Breaking News

नवी मुंबई, उरणच्या पाणथळ जागांचे संरक्षण आवश्यक

सिडको अधिकारी व जिल्हाधिकार्‍यांना अहवाल सादर करण्याचे आदेश

उरण : प्रतिनिधी

उरण तालुक्यातील पाणजे, डोंगरी, बेलपाडा, भेंडखळ तर नवी मुंबईतील सीवूड परिसरातील चाणक्य ट्रेनिंग स्कुल, एनआरआय कॉम्प्लेक्स आदी पाच ठिकाणी दुर्मिळ पक्षांच्या वास्तव्यासाठी उपयुक्त असलेल्या आणि पर्यावरणाचा समतोल राखणार्‍या मॅन्ग्रोजची वाढ होण्यासाठी आवश्यक ठरत असलेल्या पाणथळी, दळी जमिनींच्या संरक्षण, सवंर्धनाची आवश्यकता निर्माण झाली आहे. त्यामुळे पाणथळी, दळी जागांचे आरक्षण जाहीर करण्याबाबत सिडको अधिकारी व ठाणे, रायगड जिल्हाधिकार्‍यांना अहवाल सादर करण्याचे आदेश वनविभागाच्या मुंबई मॅन्ग्रोज सेलने दिले आहेत.  नवी मुंबई, उरणमध्ये असलेल्या पाणथळी आणि दळी जागा विकासाच्या नावाखाली नष्ट केल्या आहेत. यामुळे पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी उपयुक्त असलेली कांदळवन लुप्त झाली. त्याशिवाय कांदळवन, पाणथळी आणि दळी जागा उच्च जैविकता आणि विविध प्रकारच्या पक्षांसाठी आश्रयस्थाने बनली. पर्यावरणाच्या सरंक्षणासाठी असलेल्या पाणथळी आणि दळी जागा विकासाच्या नावाखाली नष्ट होत चाललेल्या आहेत. त्यामुळे त्याचे विपरीत परिणाम आता दिसू लागलेत. बॉम्बे नॅशनल हिस्ट्री ऑफ सोसायटी या निसर्ग संस्थेच्या अहवालानुसार कांदळवन, पाणथळी, दळी जागा नष्ट झाल्याने नवी मुंबई व उरण परिसरात पक्ष्यांची संख्या कमी झाली आहे. उच्च जैवविविधतेचे प्रमाणही घटले आहे. त्यामुळे पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी आणि पक्षांच्या वाढीसाठी पाणथळी, दळी जमिनींच्या सरंक्षण, संवर्धनाची आवश्यकता निर्माण झाली असल्याचा अभिप्रायही नोंदविण्यात आला आहे. तसेच या प्रकरणी काही संस्थांनी न्यायालयातही दाद मागितली आहे. या पार्श्वभूमीवर नवी मुंबई, उरण परिसरात अत्यंत महत्त्वाच्या पाच ठिकाणी पाणथळी, दळी जागा शिल्लक आहेत. यामध्ये उरण तालुक्यातील पाणजे-डोंगरी येथील पश्चिम भाग, बेलपाडा गावाकडील उत्तर-पश्चिम भाग, भेंडखळ गाव हद्दीतील दक्षिण भाग तर नवी मुंबईतील सीवूड परिसरातील चाणक्य ट्रेनिंग स्कुल परिसरातील भाग, सीवूड परिसरातील एनआरआय कॉम्प्लेक्स आदी पाच ठिकाणी पाणथळी दळी जागा उपलब्ध आहेत.

पर्यावरणाचा समतोल काळाची गरज

दुर्मिळ पक्षांच्या वास्तव्यासाठी उपयुक्त असलेल्या आणि पर्यावरणाचा समतोल राखणार्‍या मॅन्ग्रोजची वाढ होण्यासाठी आवश्यक ठरतं असलेल्या या पाचही पाणथळी, दळी जमिनींच्या सरंक्षण, संवर्धनाची आवश्यकता निर्माण झाली आहे. त्यामुळे पाणथळी, दळी जागांचे आरक्षण, सरंक्षण, संवर्धन जाहीर करण्याबाबत सिडको अधिकारी व ठाणे, रायगड जिल्हाधिकार्‍यांना अहवाल सादर करण्याचे आदेश वनविभागाच्या मुंबई मॅन्ग्रोज सेलचे अ‍ॅडिशन प्रिन्सिपल चिफ कॉन्झरवेटर विरेंद्र तिवारी यांनी दिले आहेत.

Check Also

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या विजयाचा पीआरपीकडून निर्धार

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार आमदार प्रशांत ठाकूर यांना चौथ्यांदा विजयी …

Leave a Reply