Breaking News

उरण डेपोतून गणेशोत्सवासाठी ज्यादा बसेस

उरण : बातमीदार

उरण एसटी आगारातून गौरीगणपतीसाठी सालाबादप्रमाणे यंदाही उरणवासीयांना कोकणात जाण्यासाठी ज्यादा बस सोडण्यात येणार आहेत. याबाबत आगारप्रमुख श्री. नाईकवाड यांची कोकणवासीय उत्कर्ष संस्थेच्या पदाधिकार्‍यांनी भेट घेतली. संस्थेचे अध्यक्ष ज्येष्ठ पत्रकार गोपीनाथ चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली संस्थेचे पदाधिकारी कार्याध्यक्ष नंदकुमार साळवी, सहसचिव प्रमोद पाटोळे, सदस्य संतोष पवार, सचिव राकेश केळकर आदी पदाधिकार्‍यांनी श्री नाईकवाड यांची भेट घेऊन गणपतीसाठी ज्यादा बस सोडण्यात यावी यासाठी निवेदन देण्यात आले. त्या वेळी नाईकवाड यांनी पुढीलप्रमाणे बस सोडण्यात येणार आहेत, असे सांगितले.

दिनांक 31 ऑगस्ट व 1, 2 सप्टेंबर रोजी उरण ते पोलादपूर, खेड सकाळी 7 वाजता; दिनांक 31 ऑगस्ट व 1 सप्टेंबर उरण ते गुहागर सकाळी 7 वाजता; दिनांक 31 ऑगस्ट उरण ते राजापूर (रातराणी) रात्रौ 8 वाजता; दि. 1 सप्टेंबर रोजी उरण ते रत्नागिरी सकाळी 7 वाजता; उरण  दापोली  व उरण  श्रीवर्धन बस ग्रुप बुकिंगनुसार सोडण्यात येणार आहेत. बससाठी बुकिंग 1 ऑगस्टपासून सुरू होणार आहे. त्यानंतर दि. 10 ऑगस्टपासून ऑनलाइन  बुकिंग सर्वांसाठी सुरू होणार आहे. ग्रुप बुकिंग  दिनांक 22 जुलैपासून  सुरू होईल. प्रवाशांनी याची दखल घेऊन लवकरात लवकर  आपले प्रवास बुकिंग  करावे, असे आवाहन कोकणवासीय उत्कर्ष संस्था उरणतर्फे करण्यात आले आहे.

Check Also

अखिल भारतीय टेबल टेनिस स्पर्धेत स्वस्तिका घोष विजेती

लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्याकडून अभिनंदन पनवेल : रामप्रहर वृत्त अखिल भारतीय आंतर संस्थात्मक टेबल टेनिस …

Leave a Reply