दोन कोटींची मदत, इतरांनाही आवाहन
नवी दिल्ली ः वृत्तसंस्था
आयपीएल स्थगित झाल्यानंतर घरी परतलेल्या विराट कोहली आणि त्याची पत्नी अनुष्का शर्मा यांनी कोरोना लढ्यात सहभाग घेतला आहे. ‘केट्टो’सोबत मिळून हे दोघे निधी गोळा करणार आहेत आणि त्यातील प्रत्येक रक्कम ही कोरोना लढ्यासाठी वापरली जाईल. त्यांनी स्वतः दोन कोटींची मदतही केली आहे.
या संदर्भात ‘विरुष्का’ने सोशल मीडियावर एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. ’देशातील आरोग्य यंत्रणा न थकता, न थांबता कोरोना व्हायरसशी मुकाबला करीत आहेत, पण आता कोरोनाच्या दुसर्या लाटेने आपल्या आरोग्य यंत्रणेलाच आव्हान दिले आहे. आता आपण सर्वांनी एकत्र येऊन भारताला मदत करण्याची गरज आहे. अनुष्का आणि मी ‘केट्टो’वर एक मोहीम सुरू केली आहे. त्यातून जमा होणार निधी हा कोरोना लढ्यासाठी वापरला जाणार आहे. तुमचा पाठिंबाही महत्त्वाचा आहे. आयुष्य वाचवण्यासाठी छोटीशी मदतही खूप मोठी असते,’ असे या दोघांनी या व्हिडिओत म्हटले आहे.