Breaking News

नवी मुंबई विमानतळाला ‘दिबां’चेच नाव हवे!

कामोठे ग्रामस्थांचा एल्गार

पनवेल ः रामप्रहर वृत्त

नवी मुंई आंतरराष्ट्रीय विमानतळाला शिवसेनाप्रमुख बाळासाहे ठाकरे यांचे नाव देण्याचा प्रस्ताव नुकताच सिडकोच्या वतीने पारित करून तो राज्य शासनाकडे पाठविण्यात आला आहे. त्यामुळे स्थानिक भूमिपुत्र, प्रकल्पग्रस्तांमध्ये नाराजी पसरली आहे. याच संदर्भात कामोठे ग्रामस्थ मंडळाच्या वतीने शनिवारी (दि. 8) पत्रकार परिषद आयोजित करून विमानतळाला प्रकल्पग्रस्तांचे झुंझार नेते स्व. दि. बा. पाटील यांचे नाव द्यावे, अशी आग्रही भूमिका मांडण्यात आली.

शंभर हुतात्मे झाले तरीसुद्धा बेहत्तर, परंतु नवी मुंबई विमानतळाला ‘दिबा’ यांचेच नाव देण्यात यावे, असा एल्गार ग्रामस्थ मंडळाच्या वतीने करण्यात आला. सन्माननीय ाळासाहे ठाकरे यांच्याबद्दल आम्हाला आदर असला तरी आम्हा प्रकल्पग्रस्तांच्या जीवनामध्ये आणि नवी मुंबई विमानतळाच्या उभारणीमध्ये बाळासाहेबांचे कर्तृत्व आणि योगदान काय, असा सवाल या वेळी ग्रामस्थांच्या वतीने उपस्थित करण्यात आला. आज आम्ही प्रकल्पग्रस्त बांधव जे काही सुखद जीवनमान अनुभवत आहोत त्याचे परिपूर्ण श्रेय दि. बा. पाटील साहेबांचे आहे. त्यांच्या नेतृत्वातूनच आम्हा प्रकल्पग्रस्तांसाठी साडेबारा टक्के परताव्याचे सूत्र संपूर्ण राज्यात लागू झाले. त्यामुळे नवी मुंबई विमानतळाला नाव देण्याचा विषय येईल तेव्हा आदरणीय लोकनेते दि. बा. पाटील यांच्या नावाव्यतिरिक्त दुसर्‍या कुठल्याही नावाचा विचार होऊ शकत नाही, असे ग्रामस्थ मंडळाने ठामपणे सांगितले.

या पत्रकार परिषदेस मंचावर जय हनुमान ग्रामस्थ मंडळाची पंच कमिटी उपस्थित होती. यामध्ये के. के. म्हात्रे, सूरदास गोवारी, नगरसेवक विजय चिपळेकर, शंकर म्हात्रे, सुधाकर पाटील, राजेश गायकर, सखाराम पाटील, भालचंद्र म्हात्रे, विजय गोवारी, जाना गोवारी, रमेश म्हात्रे, सुनील गोवारी, प्रकाश पाटील आदी उपस्थित होते.

पनवेल महापालिकेत प्रतिनिधित्व करणारे कामोठ्यातील दोन नगरसेवक विजय चिपळेकर आणि शंकर म्हात्रे यांनी नवी मुंबई विमानतळाला स्व. दि. बा. पाटील यांचे नाव देण्याचा प्रस्ताव आम्ही महापालिकेच्या सभेत मांडू व मंजूर करून घेऊ, असे या वेळी नमूद केले.

‘दिबां’ आणि कामोठे ग्रामस्थांचे ऋणानुबंध

प्रकल्पग्रस्तांचे झुंझार नेते दि. बा. पाटील आणि कामोठे ग्रामस्थांचे ऋणानुबंध जोडले गेले त्याला अनेक वर्षांचा इतिहास आहे. 1965 साली शासनाने कामोठे गावाची गुरचरणाची जमीन जवाहर इंडस्ट्रीज सोसायटीसाठी परस्पर संपादित केली. तेव्हा हवालदिल झालेले गावकरी ‘दिबां’कडे गेले. ‘दिबां’नी कामोठे गावातील सर्व महिला, पुरूष, गोठ्यातील गाई, म्हशी, बैल व बैलगाडी घेऊन पनवेल तहसीलदार कार्यालयावर विशाल मोर्चा काढला होता. त्यावेळी हा मोर्चा जिल्ह्यात प्रचंड गाजला. त्यामुळे दबावात आलेल्या जिल्हाधिकार्‍यांनी संपादित केलेल्या जमिनीपैकी सात एकर जमीन नोटिफिकेशन मधुन वगळून गावकर्‍यांना गुरचरणासाठी परत केली. याच जागेवर पुढे गावकर्‍यांनी शाळा उभी केली. कामोठे ग्रामस्थांनी स्वखर्चाने बांधलेल्या या शाळेचा खर्च त्याकाळात लोकवर्गणीतून चालविला जात असे. शिक्षकांचे व कर्मचार्‍यांचे पगार सुरूवातीस गावकरी करीत होते. आज ही शाळा अनुदानित असुन रयत शिक्षण संस्थेच्या माध्यमातून या विभागातील सर्वांत स्वस्त आणि दर्जेदार शिक्षण येथे देण्यात येते.

Check Also

रामबाग उद्यानाचा रविवारी वर्धापन दिन सोहळा

पारंपरिक लोकगीते व कोळीगीतांचा बहारदार कार्यक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त दुबईच्या धर्तीवर पनवेल तालुक्यातील न्हावेखाडी …

Leave a Reply